
Hit and Run Near Lalbaugcha Raja, 2-Year-Old Girl Dead
Esakal
मुंबई पुण्यासह राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीय. पुण्यातील मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झालेत. तर मुंबईतही गणपती विसर्जन मिरवणुक सुरू झालीय. मिरवणूक पाहण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झालीय. दरम्यान, मुंबईत लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीआधी गणेशोत्सवाला गालबोट लागलंय. लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय. तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय.