कोकण

चक्रभेदी

CD

चक्रभेदीतर्फे करियर
मार्गदर्शन शिबिर
साखरपा ः चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्यावतीने गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने एका करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर वाशीतर्फे देवरूख शाळेत झाले. चक्रभेदी सोशल फाउंडेशन या संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. शिबिरात विद्यार्थ्यांच्या वाचनावर भर देण्यात आला. शिक्षकांना संस्थेच्या संस्थापिका वैदेही सावंत यांनी अन्य विषयांची माहिती दिली. परिसरातील विधवा आणि एकल महिलांच्या पाल्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात वह्या, छत्र्या, दप्तर यांचा समावेश होता. शिक्षणविस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

गणेश मावेनूर
जिल्हा गुणवत्ता यादीत
साखरपा ः शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या गणेश मावेनूर या नववीतील विद्यार्थ्याने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. आठवीत असताना त्याने दिलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण अनुसूचित जाती या विभागात गणेश मावेनूर याने जिल्हा यादीत पाचवे स्थान मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. शाळा कमिटीचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर, मुख्याध्यापिका लीना कबनूरकर आदींनी त्याचे अभिनंदन केले.

साखरपा केंद्रशाळेत
गुरुपौर्णिमा साजरी
साखरपा ः साखरपा केंद्रशाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. शालेय समितीच्या नियोजनातून हा सण साजरा करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप जोयशी यांनी गणेशवंदना सादर केली. केंद्रीय प्रमुख दिव्या भाटकर यांच्यासह सर्व शिक्षकांचे औक्षण करण्यात आले. या निमित्ताने शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक शिंदे, उपाध्यक्षा शुभ्रा नारकर, सदस्या पूर्वा अभ्यंकर यांनी मनोगते व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

Mahabaleshwar incident: प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला; महाबळेश्वरमधील पंचनद्यांचे उगमस्थान,'पुरातत्त्व'च्या दुर्लक्षपणामुळे नेमकं काय घडलं!

Summer Heat Increase : राज्य आता ‘रेड’झोनमध्ये; उष्णतेच्या लाटेचा प्रकोप वाढला

PNG Gas Connection : महिनाभरात १४ हजार जोडण्या; ‘पीएनजी’ बंधनकारक केल्याने मागणीत तिप्पट वाढ

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी 'Orange Cap'च्या शर्यतीत पाचव्या स्थानावर फेकला गेला, पुढे चार स्टार फलंदाज; RCBच्या विजयाने इथेही उलटफेर

SCROLL FOR NEXT