कोकण

लोकसंख्यावाढीची विकासापुढे समस्या

CD

लोकसंख्यावाढीची
विकासापुढे समस्या
रत्नागिरी : भारतात विकासापुढे लोकसंख्यावाढ ही प्रमुख समस्या असल्याचे प्रतिपादन धनाजी वाघमोडे यांनी केले. गोदूताई जांभेकर विद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापिका संजना तारी उपस्थित होत्या. वाघमोडे यांनी असणारी बेरोजगारी, अंधश्रद्धा, गुन्हेगारी, पर्यावरणाचा ऱ्हास, साक्षरतेचा अभाव हेच देशाच्या लोकसंख्यावाढीस पूरक घटक आढळतात. याचाच बीमोड करून लोकांमध्ये या घटकांविषयी जनजागृती करणे, हा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. जनजागृती हाच कायद्यापेक्षा मोठा उपाय असल्याचे आवर्जून सांगितले. सूत्रसंचालन अनिल सागवेकर यांनी केले.
--------
जाकादेवी विद्यालयात
दाखल्यांचे शिबिर
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये विद्यालयात १७ जुलैला विविध शैक्षणिक दाखल्यांचे शिबिर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत होणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आवश्यक असलेले महत्त्वपूर्ण दाखले या शिबिरात देण्यात येणार आहेत. विद्यार्थी व पालकांनी संबंधित दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे शिबिरात सादर करावीत. जाकादेवी विद्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता शिबिर होईल, असे मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बंधू मयेकर यांनी केले आहे.
-----------
शिर्के प्रशालेत
लोकसंख्या दिन
रत्नागिरी : खेड्यांचा विकास झाल्यास शहरावरील लोकसंख्येचा ताण कमी होईल, असे मत रा. भा. शिर्के प्रशालेत जागतिक लोकसंख्या विस्फोट दिन कार्यक्रमात पडवेकर यांनी केले. वाढत्या लोकसंख्येची माहिती देताना लोकसंख्यावाढीची कारणे, समस्या व त्यावरील उपाययोजना सांगितल्या. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे, उपमुख्याध्यापिका पवार, पर्यवेक्षिका कांबळे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन डोईफोडे यांनी केले. स्वराज्य सभा व सांस्कृतिक विभागाच्या उत्तम नियोजनामुळे कार्यक्रम प्रभावीपणे पार पडला. स्वराज्य सभाप्रमुख दुदगीकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया; कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांच्या ‘भागूबाई’चा ट्रेलर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update: मुंबईत गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना अटक

सतीश राजवाडे आणि ये रिश्ता फेम अभिनेत्रीचा रंगभूमीवर कमबॅक; नाटकाचं नाव आणि शुभारंभाची तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT