कोकण

दोडामार्ग नगरपंचायतीमार्फत सार्वजनिक विहिरीचे लोकार्पण

CD

swt1511.jpg
77698
दोडामार्ग ः लोकार्पणप्रसंगी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मान्यवर व महिला वर्ग.

दोडामार्ग नगरपंचायतीमार्फत
सार्वजनिक विहिरीचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १५ : नगरोत्थान जिल्हास्तर योजनेच्या माध्यमातून दोडामार्ग बाजारपेठेतील नूतनीकरण व सुशोभीकरण झालेल्या सार्वजनिक विहिरीचे लोकार्पण आज करण्यात आले. प्रभाग क्रमांक ११ व प्रभाग क्रमांक ८ मधील महिलांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमाला होती. शहरात महत्त्वाचा मानल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक ११ मधील बाजारपेठेत आयी रस्त्यालगत पूर्वीपासून एक सार्वजनिक विहीर आहे. प्रभाग क्रमांक ११ व ८ या दोन्ही प्रभागांतील रहिवाशांसाठी ही विहीर महत्त्वाची आहे. प्रभाग क्र. ११ मधील नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती नितीन मणेरीकर यांनी या विहिरीच्या नूतनीकरण व सुशोभीकरणाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान जिल्हास्तर निधी योजनेअंतर्गत ९ लाख, ९९ हजार ७६२ रुपये खर्चून हे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. येथील ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत परमेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विहिरीचे लोकार्पण करण्यात आले. नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, उपनगराध्यक्ष देविदास गवस, माजी सरपंच प्रदीप चांदेलकर, श्याम मणेरीकर, सागर चांदेलकर, विशांत परमेकर उपस्थित होते. स्वागत नगरसेवक नितीन मणेरीकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT