कोकण

तळकट पंचक्रोशीत बीएसएनएल ठप्प

CD

swt1612.jpg
77903
कणकवली ः येथे खासदार नारायण राणे यांना तळकट सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले यांनी निवेदन सादर केले. यावेळी उपस्थित संतोष नानचे, अंकुश जाधव, फोंडू हडीकर, प्रज्योत देसाई व इतर.

तळकट पंचक्रोशीत बीएसएनएल ठप्प
प्रशासकीय कामांमध्ये व्यत्ययः सरपंचांनी वेधले खासदार नारायण राणेंचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १६ ः तळकट गावासहित संपूर्ण पंचक्रोशीत बीएसएनएलची रेंज मिळण्यात वारंवार अडथळे येत आहेत. खासगी कंपन्यांची रेंज उपलब्ध होण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी तळकट सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले तसेच परिसरातील ग्रामस्थांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली.
सुपारी, नारळ, केळी, भात आदी शेतीबागायतींसाठी समृद्ध म्हणून ओळखणाऱ्या येणाऱ्या तळकट गावासहित संपूर्ण पंचक्रोशीतील गावांना बीएसएनएलची नेटवर्क सुविधा चांगल्या प्रकारे मिळत नाही. ग्रामपंचायत, रेशन दुकान, शाळा, बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच अन्य ठिकाणी ही रेंज नसल्याने अनेकांना अडचणी येत आहेत. अनेक प्रशासकीय कामे अक्षरशः खोळंबून राहतात. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या संदर्भात वारंवार बीएसएनएलचे लक्ष वेधले आहे. परंतु, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार राणे यांची तळकट सरपंच सावंतभोसले यांनी भेट घेतली व त्यांचे याकडे लक्ष वेधले. त्यांच्यासोबत असलेल्या संतोष नानचे यांनी देखील तळकट पंचक्रोशीमध्ये बीएसएनएल रेंजची सध्याची अवस्था व खासगी कंपन्यांची रेंज किती आवश्यक आहे? ते स्पष्ट केले. दरम्यान, या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्याचे सुतोवाच श्री. राणे यांनी केले. जिल्ह्यात समृद्ध शेती बागायतींचा भाग म्हणून सुपरिचित असलेल्या तळकट दशक्रोशीमध्ये केवळ मोबाईल रेंजच नव्हे तर अन्य विकास कामे होण्यासाठी तेथील ग्रामस्थांच्या निवेदनांना प्राधान्य देऊ, असेही खासदार राणे म्हणाले. यावेळी माजी समाजकारण सभापती अंकुश जाधव, दोडामार्गमधील फोंडू हडीकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Social Media Ban : नेपाळमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदीचं नवीन कारण आलं समोर, कोणते अ‍ॅप सुरू अन् कोणते बंद?

घरच्यांच्या विरोधात जाऊन गायिकेने केलेलं 20 वर्षं मोठ्या व्यक्तीबरोबर लग्न; घरगुती हिंसेची शिकार आणि बहिणींमधील भांडण

Asia Cup Live Streaming: आशिया कप जिओ हॉटस्टारवर नाही दिसणार; मग IND vs PAK मॅच कुठे पाहता येणार?

न्यायालयाला राजकारणाचा आखाडा बनवू नका, नेता असाल तर कातडी जाड हवी; सुप्रीम कोर्टानं भाजपलाच झापलं

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला टॉप ऑर्डरवर खेळवा, शुभमन गिलसाठी दुसरी जागा शोधा...; Ravi Shastri यांचा गौतम गंभीरला सल्ला

SCROLL FOR NEXT