77908
77907
झोळंबे ः येथे आढळलेला दुर्मीळ ‘सिसिलियन’ उभयचर जीव
झोळंबेत आढळला दुर्मीळ ‘सिसिलियन’
उभयचर जीव; हालचाल सापाप्रमाणे, पश्चिम घाटात वास्तव्य
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १६ : झोळंबे येथील ‘बागायतदार फार्म स्टे’ या कृषी पर्यटन केंद्राच्या परिसरात सापासारखा दिसणारा दुर्मीळ ‘सिसिलियन’ हा उभयचर जीव केंद्र संचालक ओंकार गावडे आणि गोव्यामधील वन्यजीव अभ्यासक विकास कुलकर्णी यांना आढळून आला.
प्रथमदर्शनी हा गांडूळ असल्याचा भास झाला. मात्र, त्याची हालचाल एखाद्या सापाप्रमाणे होती. खात्री करून घेण्यासाठी कुलकर्णी यांनी सरीसृप अभ्यासक वरद गिरी यांना फोनवरून संपर्क साधून माहिती दिली. तसेच छायाचित्रे पाठविली. गिरी यांनी या सापाची अचूक ओळख सांगत माहिती दिली.
‘‘सिलिलियन’ हा आपल्या नैसर्गिक अधिवासात असल्याने त्याला त्रास न देता आणि न हाताळता शक्य तेवढी छायाचित्रे घेण्यात आली. या जीवाला शास्त्रीय भाषेत ‘बाँबे सिसिलियन’ आणि मराठीत ‘देव गांडूळ’ असे म्हणतात. हा उभयचर असून पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी त्याचा अधिवास असतो. त्याचे मुख्य खाद्य गांडूळ आहे. त्याला स्पर्श केल्यास शरीर बुळबुळीत लागते. कारण शिकार होऊ नये, म्हणून तो आपल्या शरीरावर चिकट, बुळबुळीत स्त्राव सोडतो. हा जीव प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळून येतो. डोळे अगदी छोटे टाचणीच्या आकाराचे आणि सहज न दिसणारे असतात. गोलाकार रिंगण (स्केल्स) असणाऱ्या शरीरावरून त्याची ओळख निश्चित होते,’’ असे वरद गिरी यांनी सांगितले.
‘‘या निमित्ताने दोडामार्ग तालुक्यातील पश्चिम घाटालगत असलेल्या गावामधील जैवविविधतेचा अभ्यास करून आढळणारे वन्य जीव आणि अन्य जीवांची नोंद करणे आवश्यक आहे,’’ असे आंबोली येथील प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि छायाचित्रकार महादेव (काका) भिसे यांनी सांगितले.
--
...असा आहे ‘सिलिलियन’
- शास्त्रीय भाषेत ‘बाँबे सिसिलियन’ आणि मराठीत ‘देव गांडूळ’
- पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी अधिवास
- ‘सिलिलियन’चे मुख्य खाद्य गांडूळ
- शिकार होऊ नये म्हणून शरीरावर चिकट स्त्राव
---
कोट
‘सिलिलियन’ हा जीव प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळून येतो. डोळे अगदी छोटे टाचणीच्या आकाराचे आणि सहज न दिसणारे असतात. गोलाकार रिंगण (स्केल्स) असणाऱ्या शरीरावरून त्याची ओळख निश्चित होते.
- वरद गिरी, सरीसृप अभ्यासक
---
या जीवाची नोंद करण्यासाठी झोळंबे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये जैवविविधता नोंदवहीत पत्रव्यवहार केला जाईल. झोळंबे गाव अगदी पश्चिम घाटालगत असल्याने परिसरात आढळणाऱ्या जैवविविधतेची नोंद ‘बागायतदार फार्म स्टे’मध्येही ठेवली जाणार असून, भविष्यात सरीसृप अभ्यासकांना त्याचा उपयोग होईल.
- ओंकार गावडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.