कोकण

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कर्ष परबचे यश

CD

wt1722.jpg
78174
कासार्डे ः उत्कर्ष परबचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना मुख्याध्यापिका बी.बी. बिसुरे व इतर.

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कर्ष परबचे यश
तळेरे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील आठवीचा विद्यार्थी उत्कर्ष परब याने जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ४६ वा क्रमांक तर तालुका गुणवत्ता यादीत १४ वा क्रमांक पटकावून शाळेची उज्वल परंपरा अबाधित ठेवली. पाचवीतील शुभम गावडे याने जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून शाळेची मान उंचावली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना आठवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सविता जाधव, अनंत काणेकर, विधी मुद्राळे, यशवंत परब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे, ज्येष्ठ शिक्षक ए. पी. घुले यांनी अभिनंदन केले.
....................
swt1723.jpg
N78175
तळेरे : लोकसंख्या दिन कार्यक्रमात बोलताना डॉ. धनश्री जाधव.

महाडिक विद्यालयात लोकसंख्या दिन
तळेरे : येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि मेरा युवा भारत सिंधुदुर्ग यांच्यावतीने विद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. यावेळी तळेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री जाधव, प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका डी. सी. तळेकर, सहायक शिक्षिका एस. यू. सुर्वे, व्ही. डी. टाकळे आदी उपस्थित होते. शिक्षण, कुटुंब नियोजन आणि आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. या माध्यमातून लोकसंख्या वाढीबाबत योग्य ते पाऊल उचलू शकतो, असे प्रतिपादन डॉ. जाधव यांनी केले. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणू शकलो तरच नैसर्गिक संसाधनांचा सुद्धा योग्य प्रमाणात वापर होईल, असे मनोगत डी. सी. तळेकर यांनी व्यक्त केले. सुचिता सुर्वे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सहायक शिक्षक व्ही. डी. टाकळे यांनी केले. आभार एस. यू. सुर्वे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा नाही; सुनील तटकरे, भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वालाही विचारात घेणार

BAMU Admissions: पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पाच हजार जणांची नोंदणी; ५६ अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज

Morning Breakfast Recipe: वीकेंडला सकाळी नाश्त्यात बनवा कुरकुरीत अन् हेल्दी पापड कोन

Chh. Sambhajinagar Crime: पाच लाखासाठी विवाहितेचा खून; पतीसह चार जणांना १० वर्षांची शिक्षा

CM Devendra Fadnavis : मुंबईत आवाज मराठी माणसाचाच; फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT