कोकण

चिपळूण-पोफळी मार्गावरील खड्ड्यांनी प्रवासी हैराण

CD

rat21p10.jpg-
78907
चिपळूण ः पोफळी मार्गावर सय्यदवाडी येथे रस्त्यावर पडलेले खड्डे.
-----------

पोफळी मार्गावरील खड्ड्यांनी प्रवासी हैराण
रस्ता दुरुस्तीची शिवसेना ठाकरे गटाची बांधकामकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ः गुहागर-विजापूर महामार्गावरील पिंपळी ते पोफळीपर्यंतचा रस्ता खड्डेमय बनला आहे. जागोजागी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या रस्त्यातील खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरू आहे. रस्त्यावरचे खड्डे तातडीने भरावेत, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख मुस्ताक सय्यद यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
या मार्गावरून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ आणि वाहनचालकांमधून होत आहे. मुंढे येथील शासकीय रोपवाटिकेसमोर रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. येथे रात्री वीज नसते. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असते. रात्री हे खड्डे दिसत नाहीत, केवळ पाणी दिसते. त्यात वाहने आदळतात आणि अपघात होतो. तशीच अवस्था पोफळी येथे ठिकठिकाणी झाली आहे. येथील सय्यदवाडीत माध्यमिक शाळेसमोरच मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. खड्ड्यात वाहने आढळल्यानंतर त्यातील पाणी पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर उडते. त्यामुळे त्यांचे गणवेश खराब होतात.
खड्ड्यांमध्ये वाहने आदळल्यानंतर त्यांच्या दुरुस्तीचा खर्च वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्याही या मार्गावर धावतात. त्या खड्ड्यात आदळल्यानंतर बंद पडतात. एसटी बंद पडल्यानंतर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत भरपावसात रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. मालवाहतुकीची वाहनेही खड्ड्यात आदळून बंद पडतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील खड्डे तातडीने भरावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

कोट
पोफळी-चिपळूण मार्गावरील डांबरी रस्त्याची अनेक ठिकाणी चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना दुचाकीचालकांचा अपघात होतो. मोठी वाहने खड्ड्यात घातल्याशिवाय पर्याय उरत नाही. पावसाळा सुरू झाल्यापासून वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हे खड्डे भरावेत.
- मुस्ताक सय्यद, शाखाप्रमुख, पोफळी, ठाकरे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chess Tournament: बुद्धीबळाचा विश्‍वकरंडक भारतामध्ये; २३ वर्षांनंतर प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरमध्ये आयोजन

Shivendraraje Bhosale: साताऱ्यात उभारणार प्रशस्‍त वाहनतळ: शिवेंद्रराजे; राजवाडा परिसरात २५० वाहनांसाठी होणार सोय

India Badminton: भारताचे सहा बॅडमिंटनपटू अपात्र; व्यवस्थापनाच्या चुकीचा फटका, जागतिक विद्यापीठ स्पर्धेला मुकले

धक्कादायक प्रकार! 'साताऱ्यात अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकावले'; एकतर्फी प्रेमातून हल्ला, युवकाला चोप अन्..

Chandrashekhar Bawankule: ‘हनीट्रॅप’मधील मंत्र्यांबाबत त्यांनाच विचारा: चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT