कोकण

...त्या ३ बहि‍णींची सुट्टी ठरली अखेरची

CD

rat२१p३.jpg-
२५N७८८८७
रत्नागिरी- मृतांचा एकत्रित फोटो.
----------

...त्या बहि‍णींची सुटी ठरली अखेरची
आरे-वारेतील दुर्घटना ; आई-वडिलांनी गमावल्या तीन मुली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारी शनिवारी (ता. १९) सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत चार पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींसह एकीच्या पतीचा समावेश आहे. या अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे. पर्यटनासाठी रत्नागिरीत आलेल्या या बहि‍णींच्या आयुष्यातील ही अखेरची सुटी ठरली. या घटनेने एकावेळी तीन मुली गमावलेल्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगरच कोसळला.
उज्मा शमसुद्दीन शेख (वय १८), हुसेरा शमसुद्दीन शेख (वय २०), जैनब जुनेद काझी (वय २८) आणि जैनब यांचे पती जुनेद काझी (३०) असे समुद्रात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. सर्वजण ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील रहिवासी होते. काही दिवसांच्या सुटीसाठी ते रत्नागिरीत आले होते. १९ जुलैला या चौघांनी दुचाकीवरून आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटनासाठी जाण्याचे ठरवले. समुद्रात उतरताना पाण्याच्या खोलीचा आणि लाटांच्या तीव्रतेचा अंदाज न आल्यामुळे सर्वजण बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर नोकरीनिमित्त दुबईमध्ये वास्तव्यास असलेले या तिन्ही बहिणींचे वडील शमसुद्दीन शेख यांना तातडीने दुर्घटनेची माहिती देण्यात आली. ही शोकांतिका ऐकून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ते दुबईहून रत्नागिरीत आले व आज सोमवारी (ता. २१) सकाळी तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर अंत्यविधी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chess Tournament: बुद्धीबळाचा विश्‍वकरंडक भारतामध्ये; २३ वर्षांनंतर प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरमध्ये आयोजन

Shivendraraje Bhosale: साताऱ्यात उभारणार प्रशस्‍त वाहनतळ: शिवेंद्रराजे; राजवाडा परिसरात २५० वाहनांसाठी होणार सोय

India Badminton: भारताचे सहा बॅडमिंटनपटू अपात्र; व्यवस्थापनाच्या चुकीचा फटका, जागतिक विद्यापीठ स्पर्धेला मुकले

धक्कादायक प्रकार! 'साताऱ्यात अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकावले'; एकतर्फी प्रेमातून हल्ला, युवकाला चोप अन्..

Chandrashekhar Bawankule: ‘हनीट्रॅप’मधील मंत्र्यांबाबत त्यांनाच विचारा: चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT