कोकण

चिपळूण-टुडे पान १ साठी, संक्षिप्त

CD

चिंचघरी-सती येथे
एनडीआरएफचे प्रात्यक्षिक
चिपळूण : एनडीआरएफ टीम कमांडर प्रमोद रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेड-चिंचघरी-सती येथे शालेय सुरक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पथकाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक पार पडले. या प्रशिक्षणात एनडीआरएफ पथकाच्या जवानांनी नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्यावेळी घ्यावयाच्या दक्षता, उपाययोजना, तत्काळ प्रतिसाद व सुरक्षिततेच्या विविध पद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली.
--------
ख्रिस्त ज्योतीतर्फे ‌
‘एक पेड माँ के नाम‌’
चिपळूण : वालोपे येथील ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूलमधील स्काऊट गाईड विभागातर्फे नुकताच ‌‘एक पेड माँ के नाम‌’ उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत स्कूल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर डेल्मा यांच्या प्रेरणेने स्काऊट गाईड विभागाचे शिक्षक सुरेश राठोड, सिद्धी कालेकर, अक्षता गांधी, पूर्वा सावले यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम झाला.
---------
‘सह्याद्री कला’चे
उच्चकलात यश
संगमेश्वर ः कला संचालनालय व कला शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेत सावर्डेच्या सह्याद्री कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या परीक्षेत कला महाविद्यालयीन स्तरावर मूलभूत अभ्यासक्रम या विभागात ज्योती पांचाळ, आदित्य सावरटकर व मिथिल अंगचेकर, मुक्ती गडदे यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. कलाशिक्षक पदविका विभागात सोनल घाणेकर, तन्वी गोरीवले, श्रावणी कुळे; कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्षामध्ये भूषण वेलये, साक्षी जाधव, भार्वी गोरूले, रेखा व रंगकला विभाग इंटरमिजिएटमध्ये सौरभ साठे, सिद्धार्थ भोवड, चिन्मय वडपकर; रेखा व रंगकला विभाग डिप्लोमामध्ये सुजल निवाते, तुळशी भुवड, साक्षी रेवणे; शिल्प व प्रतिमानबंध कला विभाग इंटरमिजिएटमध्ये सार्थक आदवडे, भूषण थवी, पंकज सुतार; शिल्प व प्रतिमानबंध कला विभाग डिप्लोमामध्ये विशाल मसणे, स्वयम वर्दम, ईशान खातू यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवला.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Crime : दरोडे, हप्ता वसुलीचे गंभीर गुन्हे; कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय गोकुळ झा याची कुंडलीच समोर

Harmanpreet Kaur: मन जिंकलंस पोरी! शतकानंतर मिळालेला POTM पुरस्कार युवा खेळाडूसोबत शेअर केला; Emotional Video

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपूरचे, तिथेच मुली सुरक्षित नाहीत : विजय वडेट्टीवार

Radhakrishna Vikhe Patil: फडणवीसांची शिर्डीवर विशेष मर्जी: राधाकृष्ण विखे पाटील; भाजप नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा

U17 Wrestling Championship : भारताचे कुस्तीपटू मॅटवर उतरण्याआधीच चितपट? १७ वर्षांखालील स्पर्धा; ग्रीस दूतावासाकडून व्हिसाची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT