कोकण

-चिपळुणात ‘आनंदयात्री पुलं’ विशेष कार्यक्रम

CD

चिपळुणात ‘आनंदयात्री पुलं’ कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ ः माणूस वाचता वाचता समजतो आणि माणूस हसता हसता शिकतो, हे पु. ल. देशपांडे यांचे विचार आजही प्रत्येक मराठी मनाच्या गाभाऱ्यात जपले जातात. अशा या बहुरंगी, बहुढंगी, बहुगुणी व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्यावतीने एक अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम ‘आनंदयात्री पुलं’ सादर करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम ६ ऑगस्टला रात्री ९.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे रंगणार आहे. यंदाचे वर्ष हे पु. ल. देशपांडे यांचे २५वे स्मृतिवर्ष आहे. त्या निमित्ताने त्यांचा साहित्यिक, नाट्य आणि संगीतक्षेत्रातील अमूल्य ठेवा चिपळूणमधील रसिक प्रेक्षकांसमोर नव्याने साकारला जाणार आहे. कार्यक्रमात पुलंच्या साहित्यातून, नाटकांमधून, गीतांमधून निवडक भाग स्थानिक कलाकारांच्या अभिनय, वाचन, गायन आणि नृत्य सादरीकरणांतून सादर होणार आहे. अंतू बर्वा, नारायण, वाऱ्यावरची वरातीमधील साक्ष, ती फुलराणी, तुझे आहे तुजपाशी यातील संस्मरणीय प्रसंग, नाच रे मोरा या गीतावरील नृत्य अशा विविध कला परंपरा एकत्रित अनुभवायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमात चिपळूणमधील जुने आणि नवे अशा ३०हून अधिक कलाकारांचा सहभाग आहे. व्याख्याते मंदार ओक यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा कार्यक्रम कांता कानिटकर यांच्या दिग्दर्शनाखाली रंगणार आहे. निवेदनाची बाजू प्रकाश गांधी, सोनाली खर्चे सांभाळतील. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

Dharur Police : दिवाळीच्या गर्दीत हरवलेली पर्स पोलिसांच्या तत्परतेमुळे परत मिळाली; एकग्राम सोने व नगद केली परत

SCROLL FOR NEXT