कोकण

राजू नाईक प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

CD

79489

राजू नाईक प्रतिष्ठानतर्फे
शैक्षणिक साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः राजू नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी तालुका संपर्कप्रमुख राजू नाईक यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या उपक्रमाच्या शेवटच्या टप्पात सावंतवाडी शहरातील सुधाताई वामनराव कामत या शाळेमधील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव, शिक्षक अर्जुन रणशूर, श्रीमती आरोदेकर, प्रणिता भगत, श्रीमती नार्वेकर आदी उपस्थित होते. श्री. नाईक यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोस गावातील एकूण पाच शाळा, आजगाव येथे दोन शाळा तसेच धाकोरे शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते गेली अनेक वर्षे शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. अभ्यास करून आई-वडिलांचे आणि गावाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव यांनी नाईक यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबाबत समस्या असल्यास नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल शाळेतील शिक्षकांनी आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Student Death नीट फेरपरीक्षेत कमी गुण मिळाले, विद्यार्थीनीनं उचललं टोकाचं पाऊल; अहिल्यानगरमध्ये खळबळ

Minister Daughter Protest: आंदोलनात मंत्र्याची मुलगी, वडिलांना ट्रोल करणं चुकीचं; मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव

Yavatmal Farmer Tragedy: कर्जमाफीच्या यादीत नाव नाही म्हणून शेतकऱ्याने संपविले जीवन

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील लाठीचार्ज विरोधात आज महत्त्वाची सुनावणी; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज विरोधात 2 याचिका दाखल

Video : ३ तास, १००० चेंडूंचा सामना... टीम इंडियात पुनरागमनासाठी सूर्यकुमार यादव गाळतोय घाम; निवड समिती करणार का विचार?

SCROLL FOR NEXT