कोकण

आजगाव ग्रामपंचायतीकडून आरोग्य उपकेंद्रास औषधे

CD

79494

आजगाव ग्रामपंचायतीकडून
आरोग्य उपकेंद्रास औषधे
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ः आजगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास आजगाव ग्रामपंचायतीमार्फत १५ व्या वित्त आयोग निधीतून औषध पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला. यात १० हजार रक्तदाब गोळ्या, पाच हजार कॅल्शियम व्हिटॅमिन डी, पाच हजार हिमोग्लोबीन गोळ्या, दोन कफ सायरप कॅन आणि काही मलम ट्यूब अशी औषधे देण्यात आली.
हा औषध साठा सुपूर्द करताना आजगाव सरपंच यशश्री सौदागर म्हणाल्या की, या औषधांचा वापर उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील रुग्णांना होणार आहे. यापुढेही ग्रामपंचायतीमार्फत या उपकेंद्राला सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित उपकेंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून रुग्णांना औषध पुरवठा करताना खूप कसरत करावी लागत होती. ही समस्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या कानावर घातली. त्यावेळी ग्रामपंचायतीने तत्काळ या समस्यांबाबत दखल घेत औषध पुरवठा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
यावेळी उपकेंद्र आरोग्य अधिकारी डॉ. सायली, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, उपसरपंच सुशील कामटेकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू पांढरे, राकेश सावंत, सेजल रेडकर, वर्षा रेवाडकर, वैष्णवी आजगावकर, ग्रामपंचायत अधिकारी संदीप गवस, आजगाव उपकेंद्र आरोग्य सेविका श्रीमती कानसे, आरोग्य सेवक प्रसाद जोशी, आशा सेविका उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० टक्के पेट्रोलचा पर्याय हवा, E20 जनता पार्टीची मागणी; २४ तासात लाखो फॉलोअर्स, कुणी सुरू केली आणि काय आहेत मागण्या?

Milk Dairy License: दूध डेअरींना मोठा दिलासा! तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर नियम न पाळता कारवाई; परवाने निलंबनाला हायकोर्टाची स्थगिती

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतर आंदोलन प्रकरणात मोठी घडामोड; PM मोदी, केंद्र सरकारविरोधातील सोशल मीडिया पोस्ट हटविण्याचे दिल्ली पोलिसांचे आदेश

Team India Schedule: झिम्बाब्वे दौरा संपला, आता टीम इंडिया कधी दिसणार अ‍ॅक्शनमध्ये, जाणून घ्या पुढच्या मालिकेचे वेळापत्रक

Sahasrakund Waterfall Remains Dry: जुलैअखेरही प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा कोरडाच, तर ‘सीता न्हाणी’ धबधबा प्रवाही

SCROLL FOR NEXT