कोकण

घाटीवळे मराठा महासंघ, चेतन नाईकना पुरस्कार

CD

- rat२४p२.jpg-
२५N७९५६४
चेतन नाईक

चेतन नाईक यांना पुरस्कार
नानासाहेब शेट्ये स्मृती ; घाटीवळे मराठा महासंघाचाही निवड
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २४ ः संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-साखरपा येथील समाजसेवक यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा कै. नानासाहेब शेट्ये स्मृती व्यक्ती पुरस्कारासाठी चेतन नाईक यांची तर संस्था पुरस्कारासाठी मुंबईतील घाटीवळे मराठा महासंघाची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कारासाठी यंदा अनेक अर्ज प्राप्त झाले होते. निवड समिती सदस्यांनी एकमताने स्मृती पुरस्कार त्यातून पात्र व्यक्ती व संस्थेची निवड केली आहे. व्यक्ती पुरस्कारासाठी पात्र ठरलेले नाईक हे वांझोळे (कुड्याचा माळवाडी) येथील ''नारळमित्र'' म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच संस्था पुरस्कारासाठी निवड झालेली घाटीवळे (पश्चिम विभाग) येथील मराठा संघ ही संस्था गेली ३० वर्षे सामाजिक कामात अग्रेसर आहे. घाटीवळे परिसरातील शाळांमध्ये भौतिक-शैक्षणिक सुविधा, विद्यार्थी गुणगौरव, विशेष गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान, विशेष व्यक्ती सन्मान, सर्वांमध्ये स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा यासाठी वार्षिक स्नेह‌संमेलन या माध्यमांतून सामाजिक बांधिलकी जपत आहे. यावर्षीच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्था यांचे अध्यक्ष संदेश शेट्ये, सरचिटणीस संतोष केसरकर, ग्रामीण समितीचे अध्यक्ष दत्ताराम शिंदे, कार्याध्यक्ष गणपत शिर्के, चिटणीस रमाकांत शिंदे, खजिनदार मारूती शिंदे, रमाकांत शेट्ये यांनी अभिनंदन केले आहे. या पुरस्कारांचे वितरण कै. नानांच्या स्मृतीदिनी १ ऑगस्ट रोजी नाना शेट्ये सभागृह, साखरपा येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Note Update: RBI कडून 2 अब्ज प्लॅस्टिकच्या नोटा लवकरच चलनात! केंद्रीय मंत्र्यांची संसदेत माहिती; कागदी नोटा बंद होणार?

सलग ५ निर्धाव षटकं अन् ५ विकेट्स; Justin Greaves इतिहास घडवला, पाकिस्तानने गुडघे टेकले; ७ फलंदाज ३८ धावांत तंबूत Video

Latest Live Updates Marathi : गोदावरीची पूर परिस्थिती सलग आठव्या दिवशी कायम

Commonwealth Games: कारगिल योद्ध्यांना विजय समर्पित... पाकिस्तानी बॉक्सरचा धुव्वा उडविल्यानंतर भारताच्या जादुमानीची भावना

Shalarth ID Scam : 841 बोगस शिक्षक अन् 160 कोटींची फसवणूक! शालार्थ घोटाळ्यात मोठा मासा गळाला; भाजप नेत्याच्या अटकेने खळबळ, संस्थाचालकाच्या फलटणमधून आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT