कोकण

चिपळूणातील उड्डाणपुलासाठी महायुती आक्रमक

CD

चिपळुणातील उड्डाणपुलासाठी महायुती आक्रमक
संघर्ष करण्याचा निर्धार ; काम कापसाळपर्यंत पूर्ण करा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावरून येथील नागरिकांमध्ये खदखद वाढत आहे. यामुळे नुकत्याच झालेल्या महायुतीच्या बैठकीत उड्डाणपुलाचे काम कापसाळपर्यंत होण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला होता. या उड्डाणपुलास निश्चित दिशा मिळण्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा केला जाणार आहे. त्याकरिता महायुतीच्या शिष्ठमंडळाची रचना तयार करण्यात आली.
गेल्या काही वर्षापासून शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचा प्रश्न गाजतो आहे. चार वर्षापूर्वी सुरू झालेल्या उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. बहादूरशेखनाका येथून सुरू होणारा उड्डाणपूल प्रांत कार्यालयाजवळ संपतो आहे. हा पूल कापसाळ विश्रामगृहापर्यंत पुढे नेण्याची मागणी वारंवार होत आहे; परंतु या मागणीला राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप अशी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच शहरात बैठक झाली होती. हा उड्डाणपूल कापसाळपर्यंत असावा, या मागणीवर सर्वांचे एकमत झाले. चिपळूण शहर सुरक्षित करावे याकरिता महायुतीने एल्गार पुकारला आहे. या उड्डाणपुलासाठी महायुतीचे आमदार शेखर निकम यांनी राज्य सरकार व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. शहरातील बौद्धवाडीतील नागरिकांनी अंडरपास मागणी केली आहे. शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी कापसाळपर्यंत हा उड्डाणपूल व्हावा याकरिता आक्रमक भूमिका घेत ११० कोटीचे अंदाजपत्रक बनवून राजकीय शक्ती वापरून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे ते सादर केले आहे. यापुढील कालावधीत उड्डाणपुलासंदर्भात पुढील पाठपुरावा व रणनीतीकरिता शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले. २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांच्यासोबत शिष्टमंडळाची अधिकृत बैठक होणार आहे.
---
२६ च्या बैठकीकडे लक्ष
चिपळुणातील उड्डाणपुलासंदर्भात २६ जुलैला सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India’s Test squad for Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे पुनरागमन, उप कर्णधार बदलला...

Viral Video: प्रचंड लाटांमध्ये मुलगा वाहून गेला; 16 वर्षीय तरुणाचा थरारक रेस्क्यू कॅमेऱ्यात, समुद्राच्या भीषण लाटांशी झुंज

Latest Live Updates Marathi : गोदावरीची पूर परिस्थिती सलग आठव्या दिवशी कायम

Koyna Dam Update : 'कोयना' शतकाकडे! धरणात 24 हजार क्युसेकने पाण्याची आवक; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, नवजात 394 मिमी पाऊस

Petrol-Diesel-LPG Price Today: कच्चे तेल 10% ने घसरले! पेट्रोल-डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

SCROLL FOR NEXT