कोकण

गावतळे-असोंड नदीकिनारी मगर आढळल्याने घबराट

CD

rat25p21.jpg
KOP25N79879
असोंड येथील नदीच्या पात्राबाहेर दिसलेली मगर.
------------
असोंड गावातील नदीकिनारी
मगर आढळल्याने घबराट
गावतळे, ता. २५ ः दापोली तालुक्यातील असोंड गावातील नदीकिनारी २४ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास मगर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.
वाकवली-उन्हवरे रस्त्यावरील असोंड हे एक महत्वाचे गाव असून २४ जुलैला दुपारी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष रूपेश बुरबाडकर हे नदीकिनारी गेले असता नदीपात्राबाहेर मगर दिसली. त्यांनी तत्काळ सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील यांना याची माहिती दिली. बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश देवघरकर यांनी तत्काळ वनविभागाला फोन करून माहिती दिली. वनाधिकारी दापोली प्रकाश पाटील आणि त्याचे सहकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २५) जागेची पाहणी केली. ही नदी वाकवली-उन्हवरे या मुख्य रस्त्यावर असलेल्या पुलाखालून वाहते. या रस्त्यावर दिवसभर रहदारी असते तसेच या भागात शेतकरी जनावरे चरावयास आणतात. नदी असल्याने या ठिकाणी खेकडे आणि मासे पकडण्यासाठी ग्रामस्थ येत असतात. या भागात शेती असल्याने ग्रामस्थांची ये-जा असते. त्यामुळेच गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या मगरीला ताबडतोब पकडून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, असे उपसरपंच दीपक देवरूखकर यांनी सांगितले आहे.

कोट
असोंड येथील नदीकिनारी परिसरात पाहणी केली आहे. ग्रामस्थांनी किनारी भागात मगर पाहिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी तिथे गस्त घालणार आहोत.
- प्रकाश पाटील, वनाधिकारी, दापोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates: प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक - महाजन

Women's Chess World Cup : दिव्या-हंपी पहिला डाव बरोबरीत, महिला विश्वकरंडक बुद्धिबळ; दोघींनीही वर्चस्वाची संधी गमावली

Nagpanchami Special Recipe: नागपंचमीला घरच्या घरी बनवा पौष्टिक ज्वारीच्या लाह्या, लगेच लिहून घ्या रेसिपी

प्लीज वाचवा! बँकेतून ९ लाख काढताच तरुणाचं कारमधून अपहरण, २ किमीवर फेकून दिलं; मदतीसाठी ओरडताना बघ्यांनी VIDEO काढला

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT