-rat२५p४१.jpg-
P२५N७९९७८
राजापूर ः ओणी-पाचल मार्गावर एसटी बस व टेम्पो यांच्यात झालेला अपघात.
--------
एसटी-टेम्पोचा अपघात
चौघे जखमी ; सौंदळ पाटीलवाडी येथील घटना
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ : तालुक्यातील ओणी-पाचल मार्गावर पाचलकडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या आजिवली-रत्नागिरी एसटी बस व दूध वाहतूक करणारा टेम्पो यांच्यामध्ये धडक झाली. शुक्रवारी (ता. २५) सकाळी सव्वाआठच्या सुमारास सौंदळ पाटीलवाडी येथील वळणावर अपघात हा झाला. या अपघातात चारजण किरकोळ जखमी झाले.
राजापूर आगाराची आजिवली-रत्नागिरी बस घेऊन चालक आर. एच. देशमुख आजिवलीकडून पाचलमार्गे रत्नागिरीकडे जात होते. गाडीत चालक-वाहकासह ४० प्रवासी होते. गाडी सौंदळ पाटीलवाडी येथील वळणावर चढावात असताना समोरून दुधाने भरलेला टेम्पो आला. टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली आणि पुढे जाऊन हा टेम्पो रस्त्याच्या बाजूला कोसळला. टेम्पोची जोरदार धडक बसल्याने एसटी बसही रस्त्याच्या साईटपट्टीच्याखाली कलंडली.
अपघातामुळे घाबरलेल्या बसमधील प्रवाशांनी मागील सुरक्षिततेसाठी असलेला दरवाजा उघडून बसबाहेर उड्या मारल्या. या अपघातामध्ये एसटी चालक आर. एच. देशमुख आणि अथर्व लिंगायत हा विद्यार्थी असे दोनजण किरकोळ जखमी झाले. टेम्पोचालक बाळप्पा रामचंद्र हागित याच्यासह टेम्पोचा क्लिनरही किरकोळ जखमी झाला. या जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. एसटी बसमधील किरकोळ जखमी विद्यार्थ्याला प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.