कोकण

गुणनियंत्रण अधिकार रद्द

CD

कृषी अधिकाऱ्यांचे गुणनियंत्रण अधिकार रद्द
शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती ; योग्य बियाणे, खत मिळावे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः तालुकास्तरावरील सर्व कृषी अधिकाऱ्यांचे गुणनियंत्रण अधिकार रद्द करण्यात आले आहेत. निरीक्षकांची संख्या कमी करण्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीमध्ये शेतकऱ्‍यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे आणि इतर निविष्ठा मिळणे अत्यंत आवश्यक असते. ही जबाबदारी जिल्हा परिषद आणि राज्यशासनाचा कृषी विभाग पार पाडत असतो. नव्या अधिसूचनेनुसार, गुणनियंत्रणाची संपूर्ण रचना बदलण्यात आली आहे. यापूर्वी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी असे चार अधिकारी गुणनियंत्रणाचे काम पाहत होते. तरीही अनेकदा बनावट खते आणि बियाण्यांच्या तक्रारी येत होत्या. आता शासनाने या सर्व अधिकाऱ्यांचे अधिकार काढून केवळ एकाच निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. प्रत्येक तालुक्यात साधारणपणे १०० ते ८०० कृषिनिविष्ठा विक्रेते कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येतील विक्रेते आणि कंपन्यांवर केवळ एक निरीक्षक नियंत्रण कसे ठेवणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाची खते व बियाणे शेतकऱ्‍यांच्या माथी मारली जाण्याची आणि अपप्रवृत्तींना वाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषद कृषी विभागाचे अधिकार कमी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१७ मध्ये देखील कृषी विभागाच्या १७ महत्त्वाच्या योजना राज्यशासनाकडे वर्ग करण्यात आल्या होत्या. कृषिनिविष्ठा विक्रीचे परवाने देण्याचा अधिकारही जिल्हा परिषदेकडून काढून घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद अधिनियम १०० नुसार, विधिमंडळाच्या परवानगीशिवाय जिल्हा परिषदेच्या योजना बंद करता येत नाहीत. असे असतानाही शासनाची ही भूमिका शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करत असून, स्थानिक पातळीवरील महत्त्वाचा विभागच संपवण्याचा हा डाव आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT