कोकण

जन शिक्षण संस्थानमार्फत सिंधुदुर्गनगरीत वृक्षारोपण

CD

80283

जन शिक्षण संस्थानमार्फत
सिंधुदुर्गनगरीत वृक्षारोपण
ओरोस ः स्वच्छ्ता पंधरवडा उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जन शिक्षण संस्थानअंतर्गत सिंधुदुर्गनगरी येथील नवनगर विकास प्राधिकरणमधील उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रम झाला. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली पुरस्कृत जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून १६ जुलैपासून स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत शुक्रवारी (ता. २५) जन शिक्षण संस्थान संचालक सुधीर पालव यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी जन शिक्षण संस्थानचे कार्यकारी मंडळ सदस्य तसेच आय.टी.आय. सिंधुदुर्गनगरीचे प्राचार्य अनिल मोहारे तसेच निसर्ग प्रेमी विजय राऊळ यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी पालव यांनी कार्यक्रमाचे महत्त्व सांगताना स्वच्छतेविषयी व कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रम अधिकारी चैत्राली शिर्के, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गणेश परब, संगणक चालक नीता कामत तसेच प्रशिक्षिका नम्रता नाईक आदी उपस्थित होते. तसेच असिस्टंट ड्रेस मेकरच्या २० लाभार्थींनी या कार्यक्रमात भाग घेतला.
......................
80284

बांदा विठ्ठल मंदिरात श्रीरामनाम जप
बांदा ः दरवर्षीप्रमाणे श्रावणमासानिमित्त येथील श्री विठ्ठल मंदिरात श्रीरामनाम जपास शुक्रवारपासून (ता. २५) प्रारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ भजनकर्मी गिरीकाका महाजन, प्रकाश उर्फ भाऊ मिशाळ, सोनू नार्वेकर यांच्या हस्ते गणेश वंदन, श्री विठ्ठल रखुमाई तसेच रामचंद्र प्रतिमा पूजन करून सर्व भाविकांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालून जपास प्रारंभ करण्यात आला. मंदिरातील सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या नित्य आरतीनंतर दररोज जपास आरंभ केला जातो. ‘श्रीराम जय राम जयजय राम’ या मंत्राच्या पाच माळा ओढल्या जातात. ग्रामस्थ, भाविक, महिला, मुलांसह वृद्धांनीही यात सहभाग घेतला. ज्यांना या जपात सहभाग घ्यायचा असेल, त्यांनी रोज सायंकाळी ७ वाजता आरतीवेळी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिरातर्फे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: भाजप नेत्याचा मुलाला ड्रग्जसह अटक! युवतीसोबत पळून जाताना थांबवले तर पोलिसांच्या अंगावर घातली गाडी

Dhananjay Munde: ...तर त्याला फाशी द्या, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

ENG vs IND 4th Test: जडेजाने इतिहास घडवला! गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी; लक्ष्मणच्याही पंक्तीत स्थान

Uddhav Thackeray: पुढचा काळ नक्कीच चांगला! राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक विधान; म्हणाले...

AI क्रांतीचा फटका! कामगिरी नव्हे, कौशल्य हवे! TCS ने बदलली खेळी, 12 हजार कर्मचाऱ्यांची करणार कपात

SCROLL FOR NEXT