
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांसाठी गडावर अन्नधान्य पुरवणारा वंजारी समाज आहे. दोष एका व्यक्तीचा असेल तर त्याला फाशी द्या; पण त्या आधारावर संपूर्ण समाजाला दोषी ठरवणे चुकीचे आहे. मी चुकलो तर मला कधीच माफ करू नका. तो विषय धनंजय मुंडेपर्यंत असावा, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ठाण्यात व्यक्त केली.