संजय चव्हाण यांचा
अलोरे येथे सत्कार
चिपळूण : गृहरक्षक दल हे केंद्र व राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली व निधीतून देशभर चालणारी संघटना आहे. मोरारजी देसाई यांनी देशांतर्गत सुरक्षेत समाजातील देशप्रेमी तरुणांचा सहभाग असावा, त्यांनी पोलिस दलासोबत काम करावे ही संकल्पना कृतीत आणली. सात्त्विक व प्रामाणिक देशसेवा ही गृहरक्षक दलाची ओळख आहे, असे विचार गृहरक्षक दल राष्ट्रपती पदक प्राप्त कमांडर सदानंद जाधव यांनी व्यक्त केले. गृहरक्षक दलात ३६ वर्षे सेवा बजावलेल्या संजय चव्हाण यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अलोरे येथील गृहरक्षकांनी आयोजित कार्यक्रमात पोलिस कर्मचारी माने यांनी कठीण प्रसंगातील कामगिरींची माहिती दिली. एक कोटी ७२ लाख रुपयांच्या चोरीचा ऐवज पकडताना गृहरक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल पोलिस अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडून दिलेले प्रशंसापात्र पोलिस निखिल वागळे यांच्या हस्ते मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
जर्मन, जपानी भाषा
अभ्यासक्रम ‘डीबीजे’त
चिपळूण : डीबीजे महाविद्यालयात भाषा अध्ययन केंद्रामार्फत जर्मन आणि जपानी भाषा अभ्यासवर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जर्मन भाषा अभ्यासवर्ग चार ते पाच महिन्यांचा असून त्यानंतर विद्यार्थी ग्योथे इन्स्टिट्यूट या आंतरराष्ट्रीय संस्थेची ए१ स्तरावरील परीक्षा देऊ शकतात. १६ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती या अभ्यासवर्गासाठी पात्र आहे. हे वर्ग दर आठवड्यात तीन ते चार दिवस संध्याकाळी घेण्यात येणार आहेत. इंजिनिअरिंग, फार्मसी, वाणिज्य आणि व्यवस्थापन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच जर्मनीमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व भाषांतर क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांसाठी हा अभ्यासवर्ग उपयुक्त ठरेल, असे नव कोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे यांनी सांगितले. या वर्षापासून जपानी भाषा अभ्यासवर्ग सुरू करण्यात आला आहे. हा वर्ग सुमारे एक वर्ष कालावधीचा आहे. डी. बी. जे. महाविद्यालयातील तसेच बाहेरील सर्व इच्छुकांसाठी या वर्गासाठी प्रवेश खुला आहे. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आव्हान यांनी तांबे केले आहे.
महिला खेळाडूंसाठी
आरोग्यविषयक शिबिर
चिपळूण ः तालुक्यातील डेरवण येथील क्रीडा संकुलात सिंम्पली स्पोर्ट फाउंडेशन आणि श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट यांच्यावतीने महिला खेळाडू व प्रशिक्षकांना आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले होते. तीन दिवसीय आरोग्य उपक्रमात एसव्हीजेसीटी इंग्लिश मीडियम स्कूल व फुरुस विद्यालयातील विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमाकरीता फिजिओथेरपीस्ट रितिका पारटे, मानसशास्त्रज्ञ वृषाली चौधरी, पोषणतज्ञ शिफ्रा वराडकर या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, प्रशिक्षक विनायक पवार, प्रतिक्षा पेंढारी, सागर साळवी, अविनाश पवार, शावजीराव निकम, फुरुस विद्यालयाच्या शिक्षिका मुग्धा टेंबे उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक उदयराज कळंबे यांचेही सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.