कोकण

अणुस्कूरा घाटात भूस्खलन रोखण्यासाठी वृक्षलागवड

CD

‘अणुस्कूरा’त भूस्खलन रोखण्यासाठी वृक्षारोपण
राजापूर-लांजा नागरिक संघाचा पुढाकार ; खापणे महाविद्यालयाचे सहकार्य
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २८ : राजापूर-लांजा नागरिक संघ आणि मनोहर हरी खापणे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण आणि पश्‍चिम घाट परिसर जोडणाऱ्‍या अणुस्कुरा घाट आणि उगवाई मंदिर परिसरामध्ये वड, पिंपळ, आंबा, काजू यांसारखी विविध प्रकारची दीर्घायू असलेली शंभरहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली. अणुस्कूरा घाट मार्गातील भूस्खलन रोखण्यासह पर्यावरण जतन आणि संवर्धनाला विविध प्रकारच्या झालेली लागवड एकप्रकारे साहाय्यभूत ठरणार आहे.
अणुस्कूरा घाट आणि येरडव येथील ऊगवाई मंदिर परिसरामध्ये आज झालेल्या वृक्षलागवडीवेळी जागतिक कीर्तीचे चित्रकार विजयराज बावधनकर, राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, गणेश चव्हाण, वृक्षमित्र अमर खामकर, आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. घाटमाथ्यावरून कोकणामध्ये येणार्‍या अनेक पायवाटा आहेत. मात्र, कालपरत्वे रहदारी कमी झाल्याने या पायवाटा दुर्लक्षित आहेत. त्यापैकी एक राजापूरातील येरडव ते अणुस्कुरा ही ऐतिहासिक शिवकालीन पायवाट. या पायवाटेवरील पुरातन पांडवकालीन मंदिर, मराठी भाषेचा अनमोल ठेवा असलला ऐतिहासिक शिलालेख, सतत वाहणारा पाण्याचा झरा आदी ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित राहीला. रायपाटण येथील श्री मनोहर खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीतून श्रमदान करीत या परिसराची डिसेंबर महिन्यामध्ये स्वच्छता केली. त्यावेळी येरडव ते अणुस्कूरा या पायवाटेवरील शिवकालीन हा ऐतिहासिक ठेवा दृष्टिक्षेपात आला आहे. त्या भागातील ऊगवाई मंदिर परिसर आणि अणुस्कूरा घाट या भागामध्ये ही वृक्षलागवड करण्यात आली आहे.

चौकट
तरुणाईही सरसावली
लावण्यात आलेल्या झाडांची निगा राखण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतल्याची माहिती येरडव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उमेश दळवी यांनी दिली. यामध्ये येरडव, कारवली, अणुस्कूरा या गावांमधील तरुणांचा समावेश असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोट
भारतातील चौदा किल्ल्यांचा युनिस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश केला आहे. ही गौरवास्पद बाब असून त्याच्यासोबत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या घाटमार्गातील जुन्या पायवाटांचीही शासनाने योग्यपद्धतीने दुरुस्ती करीत जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.
- सुभाष लाड, राजापूर-लांजा नागरिक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpanchami: नागबर्डीत तोडले जात नाही कडूलिंबाचे झाड! पिढ्यांनपिढ्यांपासूनची परंपरा, सातशे वर्षांच्या परंपरेची नागराजाची यात्रा आज

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी अन् अ‍ॅव्हकाडोचं सँडविच

शाळांच्या टप्पा अनुदानासाठी १४०० कोटी! ४९,५६२ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट पेड सप्टेंबरचा पगार २० टक्के वाढीव येणार, ‘या’ शिक्षकांना थांबावे लागणार

Panchang 29 July 2025: आज नागपंचमी, पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे

आजचे राशिभविष्य - 29 जुलै 2025

SCROLL FOR NEXT