कोकण

आत्महत्या केलेली ''ती'' तरुणी अद्याप बेपत्ताच

CD

‘ती’ तरुणी अद्याप बेपत्ताच
आत्महत्येची घटना ; शोधकार्य सुरूच
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः शहराजवळील रत्नदुर्ग किल्ल्यावरिल पाणभुयार येथून नाशिक येथील तरुणीने आत्महत्या केली होती. एक महिना उलटून गेला तरी पोलिसांच्या तपासाला यश आले नाही. या तरुणीचा अद्याप शोध लागला नाही.
सुखप्रित धालिवाल (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना २९ जूनला सकाळी रत्नदुर्ग किल्ला पाणभुयार डोंगर येथे घडली होती. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. डोंगरावरून पाण्यात झोकून देणाऱ्या या तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पोलिस जवान, माऊंटेनिअर्स टीम, एनडीआरएफ यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले होते; मात्र सर्व संसाधने वापरून या तरुणीचा शोध लागलेला नाही. पावसामुळे समुद्राला उधाण असल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. नाशिक येथे बॅंकेत नोकरीला असणारी सुखप्रित धालीवाल ही मित्राला भेटण्यासाठी रत्नागिरीत आली होती. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास तिने आपले चप्पल, जॅकेट बाजूला ठेवले आणि पाणभुयार येथील रेलिंगच्या पुढे जाऊन कठड्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पोलिसांकडून विविध मार्गाने शोधमोहीम राबवण्यात आली होती. समुद्रकिनारी भागात लक्ष ठेवण्यात येत होते; मात्र सुखप्रित हिच्याबाबत पोलिसांना अद्यापही कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: पहलगामच्या आकांचा खात्मा कसा केला? अमित शहांनी लोकसभेत वेळ ठिकाण संपूर्ण ऑपरेशन सांगितलं

TCS Recruitment: टीसीएसने कर्मचारी कपातीनंतर आता वेतनवाढ अन् भरतीही थांबवली; IT क्षेत्राचं भविष्य अंधारात?

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर माध्यमांमध्ये केलेला तमाशा, प्रणिती शिंदेंची लोकसभेत टीका, सरकारला प्रश्नांनी घेरले

Latest Maharashtra News Updates: पहलगाम हल्ल्यात सहभागी 3 दहशतवादी ठार; अमित शहांनी दिली माहिती

ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेत दिग्गजांना डावललं, काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस; माजी केंद्रीय मंत्र्याने म्हटलं, भारतात राहतो...

SCROLL FOR NEXT