कोकण

पराक्रमाचे श्रेय कारिवडेवासीयांना

CD

80651

पराक्रमाचे श्रेय कारिवडेवासीयांना

सुभेदार मेजर संजय सावंत ः ग्रामस्थ, ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २९ ः भारतीय सैन्य दलातील महत्त्वाच्या सर्व यशस्वी ऑपरेशनमध्ये मला सहभागी होता आले, हे भाग्य समजतो. या पराक्रमाचे श्रेय भारतमातेला, ग्रामदैवता कालिका मातचे आशीर्वाद आणि कुटुंबीय व कारिवडेवासियांच्या पाठबळाला, प्रोत्साहनाला देतो. ही गौरवशाली पराक्रमी कामगिरी कारिवडे गावाला समर्पित करतो. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यात माझा गौरव झाला; मात्र माझ्या कारिवडे भूमीत सैनिकी परंपरा लाभलेल्या माझ्या कुटुंबीयांच्या साक्षीने झालेला हा सत्कार विशेष आहे, असे प्रतिपादन सुभेदार मेजर संजय सावंत यांनी केले.
कारिवडे ग्रामपंचायत, कारिवडे माजी सैनिक संघटना व भैरववाडी ग्रामस्थांतर्फे आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सरपंच आरती माळकर, उपसरपंच तुकाराम आमुणेकर, ग्रामपंचायत अधिकारी भरत बुंदे, तलाठी सोनम शिरवलकर, कारिवडे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तथा हवालदार आत्माराम साईल, निवृत्त कॅप्टन लक्ष्मण सावंत, ग्रामपंचायत सदस्य महेश गावकर, नितीन गावडे, भिकाजी कवठणकर, तन्वी साईल, अरुणा सावंत, सेजल कारिवडेकर, प्रतिभा जाधव, सैनिक कल्याणचे अध्यक्ष लक्ष्मण गवळी, भाजपा आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रशांत राणे, कारिवडे सोसायटी उपाध्यक्ष रवींद्र ठाकूर, पोलिसपाटील प्रदीप केळुसकर, कारिवडे सी.आर.पी. हर्षदा कारिवडेकर उपस्थित होते.
यावेळी मेजर सुभेदार सावंत यांचे दोन्ही ठिकाणी महिलांनी औक्षण करून व पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. कारिवडे पूर्व सैनिक संघटनेचे पदाधिकारी सदस्य, भैरववाडी ग्रामस्थ, कारिवडे ग्रामस्थ, आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य सेविका तसेच बचत गटातील महिला उपस्थित होत्या. प्राथमिक शिक्षक श्री. राऊळ यांनी सूत्रसंचालन केले.
.....................
... लेकीन मराठा हटेगा नही!
यावेळी सरपंच माळकर यांनी, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचे ४५ ड्रोन आणि २ क्षेपणास्त्रांचे हल्ले आकाशातच उद्ध्वस्त करत पाडल्याचा गौरवास्पद पराक्रम केल्याने सैन्य दलाबद्दल आदर दुणावल्याची भावना व्यक्त केली. तुकाराम आमुणेकर यांनी मेजर सावंत यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिलेली शाबासकीची थाप कोकणातील युवकांसाठी ‘प्रेरणा’ असल्याचे सांगितले. आत्माराम साईल यांनी मेजर सावंत यांच्या पराक्रमाचा गौरव केला. लक्ष्मण गवळी यांनी, मेजर सावंत यांना शाबासकीची थाप देताना संरक्षण मंत्र्यांनी ‘आप मराठा हो क्या?’ असे विचारत ‘मराठा मरेगा, लेकीन हटेगा नहीं’ अशा शब्दांत त्यांच्या शौर्याचे कौतुक केल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 5th Test: अर्शदीपचे पदार्पण होणार का अन् बुमराह खेळणार की नाही? शुभमन गिलने सर्वच सांगितलं; म्हणाला..

राजेश खन्नांच्या मृत्यूनंतर घरात सापडलेल्या ६४ बंद बॅग; काय होतं त्यात? सुपरस्टारची ती इच्छा अपूर्णच राहिली

Latest Marathi News Updates : सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

Praniti Shinde: राहुल गांधींसमोर चमकोगिरी करण्यासाठी प्रणिती शिंदेंचे देशद्रोही वक्तव्य; भाजप जिल्हाध्यक्षांचा घणाघात

Fishing Ban : मच्छिमारांच्या मृत्यूला लाचखोर अधिकारी जबाबदार! महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसचे मुख्य समन्वयक मिल्टन सौदिया यांचा आरोप

SCROLL FOR NEXT