कोकण

वारस तपास, दुरुस्तीच्या नोंदी सेतूसह महा-ई सेवा केंद्रात

CD

दुरुस्तीच्या नोंदी सेतूसह महा ई-सेवा केंद्रात
शुल्काबाबत संभ्रम; प्रक्रिया गुंतागुंतीची, शेतकरी त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २९ ः राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार, वारस तपास किंवा १५५ची दुरुस्ती आणि इतर नोंदी यापुढे सेतू कार्यालय किंवा महा ई-सेवा केंद्रातूनच करून घ्याव्या लागणार आहेत; मात्र यासाठी किती शुल्क आकारावे याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश नाहीत. ही सर्व प्रक्रिया गुंतागुंतीची आणि वेळकाढूपणाची असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. एका नोंदीसाठी लागणारा वेळ आणि यासाठी होणाऱ्या खेपा लक्षात घेता सातबारावरील नोंदी पूर्वीप्रमाणे ग्राममहसूल अधिकाऱ्यांकडेच देण्यात याव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.
तालुक्याच्या कोणत्याही भागातील शेतकऱ्याला आपला सातबारा जिवंत करण्यासाठी अथवा वारस तपास किंवा अन्य दुरुस्त्यांकरिता जे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे ते तालुक्याच्या ठिकाणी जाऊन करणे गरजेचे ठरते. यासाठी शेतकऱ्याला ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. हे प्रतिज्ञापत्र आणि अन्य कागदपत्रे घेऊन परत ग्राममहसूल अधिकाऱ्यांना आणून दाखवावे लागते. त्यांनी ते तपासून त्यावर स्वाक्षरी केल्यानंतर हे सर्व कागद परत सेतू अथवा महा ई-सेवाकेंद्रात नेऊन द्यावे लागतात. यामध्ये त्रुटी निघाल्या तर ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी शेतकऱ्यांच्या फेऱ्या वाढत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ वाया जाऊन एका कामासाठी चार दिवस ते आठवड्याचा कालावधी खर्च करावा लागत आहे. याबरोबरच प्रवासामध्ये एक हजार ते बाराशे रुपये खर्च होऊन शेतकऱ्याला नाहक भुर्दंड बसत आहे. शासनाने यामधून जर शेतकऱ्यांची सोय बघितली असेल तर सोयीऐवजी या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोयच होत आहे. या निर्णयाचा महसूलमंत्र्यांनी तातडीने फेरविचार करावा आणि यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

कोट
एका कामासाठी वाया जाणारे चार दिवस ते एक आठवड्याचा वेळ आणि खर्च होणारा वारेमाप पैसा लक्षात घेता सातबाऱ्यावरील नोंदी सेतू अथवा महा ई-सेवाकेंद्रात न करता पूर्वीप्रमाणे ग्राममहसूल अधिकाऱ्यांकडे करण्याचे अधिकार द्यावेत. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन महसूलमंत्र्यांकडे याबाबत आग्रह करावा.
- रवींद्र हळबे, शेतकरी, शिवणे, संगमेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT