कोकण

रत्नागिरी ः पशुधन विकासासह दूध उत्पादनाला चालना

CD

पशुधन विकासासह दूध उत्पादनाला चालना
पशुसंवर्धन विभाग ; जिल्ह्यात ५२ हजार ३२६ दुधाळ जनावरे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः जिल्ह्यातील पशुधन विकास आणि दूध उत्पादनवाढीसाठी पशुसंवर्धन विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. जिल्ह्यात ५२ हजार ३२६ दुधाळ जनावरांची नोंद असून, त्यामध्ये संकरित पशुधनाचा वाढता वाटा महत्त्वाचा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ५२ हजार ३२६ दुधाळ जनावरे होती. त्या जनावरांमध्ये विविध प्रकारच्या गाई आणि म्हशींचा समावेश आहे. देशी प्रजातींसोबतच विदेशी आणि संकरित जातींच्या जनावरांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे. २०१९-२०च्या नोंदीनुसार, संकरित गाई ६ हजार ७०१ आणि अंगीकृत गाई २९ हजार ४६ यांची मोठी संख्या हे जिल्ह्याच्या दुग्धोत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. अंगीकृत म्हशींची संख्या ११ हजार ७ असून, ती लक्षणीय आहे. जिल्ह्यातील पशुधन विकास आणि दूध उत्पादनवाढीसाठी पशुसंवर्धन विभाग कार्य करत आहे. सध्या म्हशींच्या दुधाचे उत्पादनही जिल्ह्यात वाढत आहे. संकरित आणि अंगीकृत जातीच्या जनावरांमध्ये दूध उत्पादन क्षमता अधिक असते. त्यामुळे या जनावरांच्या वाढत्या संख्येमुळे रत्नागिरी जिल्ह्यात एकूण दुधाचे उत्पादन वाढण्यास मोठी मदत होणार आहे, ज्यामुळे पशुपालकांना अधिक आर्थिक लाभ मिळतो. ही वाढ जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आहे.

चौकट
जनावरांच्या प्रकारानुसार आकडेवारी
विदेशी गाई* ७२२
संकरित गाई* ६ हजार ७०१
संकरित विदेशी गाई* ८०१
देशी गाई* ७२७
अंगीकृत गाई* २९ हजार ४६
देशी म्हशी* ३ हजार ३२२
अंगीकृत म्हशी * ११ हजार ७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Sports Minister: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाहीच; आता क्रीडामंत्रिपद सांभाळणार

Vice President Election: उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीत कोण-कोण करणार मतदान? यादी झाली तयार!

Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

सोलापूरकरांनो, रविवारी ‘हा’ मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद! वाहनांसाठी ४ पर्यायी मार्ग; पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT