Asia Cup 2025: Bangladesh Stun Sri Lanka in Super Four Opener
esakal
Asia Cup 2025 Sri Lanka vs Bangladesh Marathi Live: श्रीलंकेच्या जोरावर सुपर ४ मधील जागा पक्की करणाऱ्या बांगलादेशने आज त्यांनाच दणका दिला. आशिया चषक २०२५ स्पर्धेतील Super Four फेरीला आजपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यात बांगलादेशने दणदणीत विजयाची नोंद केली. ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा पराभव केला नसता, तर बांगलादेश या फेरीत पोहोचले नसते.