कोकण

गोवा बनावटीच्या दारूसह वाहन जप्त

CD

-rat३०p२९.jpg-
२५N८१०७२
राजापूर ः अणुस्कुरा चेकपोस्ट येथे पकडलेल्या गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आणि वाहनचालकांसमवेत पोलिस कर्मचारी.
---
गोवा बनावटीच्या दारूसह वाहन जप्त
अणुस्कुरा चेकपोस्टवर कारवाई ; ६३ हजारांचे मद्य
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० : तालुक्यातील अणुस्कुरा पोलिस चेकपोस्ट येथे रायपाटण पोलिस दूरक्षेत्राच्या पथकाने धडक कारवाई करताना वाहनासह गोवा बनावटीच्या दारूचे सुमारे ६३ हजार ६५० रुपये किमतीचे ९५ बॉक्स जप्त केले आहेत. या कारवाईमध्ये वाहनासह सुमारे ३ लाख ६३ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवारी (ता. २९) मध्यरात्री ही कारवाई करण्यात आल्याची माहिती राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.
गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये पोलिसांनी गोवा बानवट दारूविक्रीविरोधात धडक कारवाई करत लाखो रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. त्यानंतर काल रात्री अणुस्कुरा घाटात रायपाटण पोलिस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी गोवा बनावटीची दारू वाहनासह पकडली. अणुस्कुरा चेकपोस्ट येथे रायपाटण पोलिस दूरक्षेत्रच्या पोलिस कर्मचाऱ्‍यांकडून नाकाबंदी करत असताना अचानक मोटार आली. या वेळी नाकाबंदी करत असलेले साहाय्यक पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील, पोलिस शिपाई सचिन बळीप, रामदास पाटील, स्वप्नील घाटगे यांनी ही गाडी थांबवली आणि त्या गाडीची तपासणी केली. त्या वेळी आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे एकूण ९५ बॉक्स आढळून आले. सुमारे ६३ हजार ६५० रुपये किंमतीच्या या दारूसह सुमारे तीन लाख किमतीचे वाहन पोलिसांनी या कारवाईमध्ये जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice President Election : ठरलं! ९ सप्टेंबर रोजी देशाला मिळणार नवे उपराष्ट्रती, निवडणूक कार्यक्रम जाहीर...वाचा संपूर्ण वेळापत्रक

Pune Crime : जमिनीच्या वादातून चुलत भावावर गोळीबार, वाघोली जवळील घटना; बेकायदा पिस्टलचा वापर, तरुणाची प्रकृती स्थिर

Video Vantara Team : 'वनतारा'च्या टीमला कोल्हापुरात आणण्यासाठी कृष्णराज महाडिकांचा प्रयत्न; म्हणाले, 'नांदणीत सर्वजण या...'

Latest Marathi News Updates Live: महादेवी हत्तीणीसाठी वनतारा प्रकल्पाची टीम कोल्हापुरात दाखल; हालचालींना वेग

Nagpur Municipal Schools: मनपा शाळांना सेमी इंग्रजीचे वावडे; आधुनिक काळात मातृभाषेसोबतच इंग्रजी शिक्षणाची गरज, तज्ञांचे मत

SCROLL FOR NEXT