
Mahadevi Elephant Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावच्या ‘महादेवी’ हत्तीणला अंबानी यांच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्यात आले. याबाबत राज्यभर राजकीय, सामाजिक आणि सोशल मिडियावर पडसाद उमटू लागल्यानंतर अंबानींच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्राने याची दखल घेतली. यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी पुढाकार घेत वनताराची टीम कोल्हापुरात आणण्याचा निर्णय घेतल्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ सादर केला आहे.