कोकण

रत्नागिरी-जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत देसाई हायस्कूल बाजी

CD

81479

जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत
देसाई हायस्कूलची बाजी
रत्नागिरी, ता. २ ः देवरूख (ता. संगमेश्वर) येथील मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या नेहरू सबज्युनिअर जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत येथील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलने अंतिम सामन्यात मुलींच्या संघाने बाजी मारली. या स्पर्धेत अ. के. देसाई हायस्कूलच्या १७ वर्षाखाली मुलींच्या संघाने देवरूख हायस्कूलचा पराभव केला आणि या विजयी संघाची निवड नेहरू सबज्युनिअर हॉकीच्या विभागीय स्पर्धेसाठी झाली. या सामन्यात अ. के. देसाई हायस्कूलच्या संघाने उत्तम सांघिक खेळ करून चार गोल केले. पाऊस आणि मैदानाचा काही भाग निसरडा असूनही आपले क्रीडाकौशल्य, जिद्द, प्रयत्न यामुळे हे यश मिळाल्याचे प्रशिक्षक संतोष गार्डी, सुशांत पवार, विकास साळवी यांनी सांगितले.
मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी यांनी पालकांनी मुलांना मैदानावर खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आव्हान केले. या विजयी संघात महेक मुल्ला (कर्णधार), लावण्या साळुंखे, पूर्वा कांबळे, दामिनी लोहार, मानसी आडसे, दिव्या पवार, मैथिली कांबळे, मुस्कान मुल्ला, संगीत पाल, संध्या दमाई, सानवी डोर्लेकर, श्रावणी घडशी, वेदिका सागवेकर, आयशा टुमके, जोया दसूरकर आदी खेळाडू सहभागी होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: ''..तर भीमा-कोरेगावचा इतिहास पुन्हा घडेल'' लक्ष्मण हाकेंच्या एससी आरक्षणाच्या विधानावरुन राज्यभरात संताप

Mumbai-Pune Expressway: एकविरा देवीच्या दर्शनाला जाताय? वेळापत्रक पहाच! 'या' मार्गावर बंदी; पर्यायी मार्ग जारी

GST Helpline Number : जीएसटी कमी झाल्यावरही जुन्याच किंमतीत होतेय वस्तूंची विक्री? मग इथे करा तक्रार...

IND vs PAK : औषध देण्याची गरज होती आणि...! Abhishek Sharma ने पाकिस्तान संघाचा माज उतरवला; म्हणाला, नाद कराल तर...

Smartphone Discount Offer : 80 हजारचा iPhone 15 मिळतोय 40 हजारात; 50% डिस्काउंट ऑफर, पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT