कोकण

कणकवलीत आज कर्करोग चिकित्सा

CD

कणकवलीत आज
कर्करोग चिकित्सा
कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजानिक आरोग्य विभागाची कर्करोग मोबाईल व्हॅन उद्या (ता. ४) येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल होणार आहे. ही व्हॅन सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत असणार आहे. या व्हॅनमध्ये कर्करोग तपासणीच्या विविधा सुविधा उपलब्ध असणार आहेत. यात मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग या तपासण्यांचा समावेश आहे. दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी तोंड येणे, तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा असणे, तोंड उघडायला त्रास होणे अशी मुख कर्करोगाची, मासिक पाळी व्यतिरिक्त योनीतून रक्तस्‍त्राव, मासिक पाळीचे चक्र बंद झाल्यावर रक्तस्‍त्राव, शारीरिक संबंधांनंतर रक्तस्‍त्राव, योनी मार्गातून दुर्गंधीयुक्त स्‍त्राव ही गर्भाशय मुख कर्करोगाची तर स्तनामध्ये गाठ, स्तनाच्या आकारात बदल, स्तनाग्रामधून पू अथवा रक्तस्‍त्राव ही स्तन कर्करोगाची उदाहरणे आहेत. अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तपासणी करावी. तपासणीला येताना रुग्णांनी आधारकार्ड व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल आणावा, असे आवाहन ओरोस जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Pandharpur Temple: पांडुरंगाचा लाडू प्रसाद निम्म्याच भक्तांनाच मिळणार; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा; उत्पादन निम्म्यावर!

Latest Marathi News Live Update : गॅस दरवाढीवरून रिक्षाचालकांचा संताप, गॅस पंपाला घेराव

भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

SCROLL FOR NEXT