कोकण

महामार्ग दुरावस्थेविरोधात १३ ला ''चक्का जाम''

CD

82135

महामार्ग दुरावस्थेविरोधात १३ ला ‘चक्का जाम’
ठाकरे शिवसेनेचा इशाराः हुमरमळा येथे सकाळी अकरा वाजता निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ः संपूर्ण देशामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक रस्ते केले. परंतु, मुंबई-गोवा महामार्ग रस्ता होऊ शकलेला नाही. याला गडकरी सुद्धा जबाबदार आहेत. कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेले, अनेक ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट केल्यामुळे बहुतांश ठिकाणी रस्त्याची पडझड होत आहे. चाकरमान्यांचा या वर्षीचाही प्रवास खड्ड्यातून होणार आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी बुधवारी (ता.१३) सकाळी ११ वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील हुमरमळा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
येथील एमआयडीसी येथे श्री. नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत माजी आमदार परशुराम उपरकर, संदेश पारकर, सतीश सावंत, मंदार शिरसाट, कृष्णा धुरी, गंगाराम सडवेलकर, बबन बोभाटे, बाबल गावडे, दीपक गावडे, गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.
श्री. नाईक पुढे म्हणाले, ‘‘मुंबई-गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या महामार्गाचे काम अकरा वर्षांपूर्वी सुरू झाले होते. मात्र, सद्यस्थितीत या महामार्गाला जीवघेणे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी अपघात होत आहेत, ज्या उद्देशाने हा चौपदरीकरण महामार्ग बनवण्यात आला, तो अजूनही पूर्ण झालेला नाही. तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा महामार्ग गेल्या वर्षी गणेशोत्सवात पूर्ण होईल, असे सांगितले होते. मात्र, आता दुसरा गणेशोत्सव आला तरी महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. अजूनही पुढील एक वर्ष तो पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे ठाकरे शिवसेनेच्यावतीने १३ ला चक्का जाम आंदोलन छेडण्यात येणार आहे.’’
श्री. उपरकर म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षापासून राज्य बदलली, मंत्री बदलले, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याच महामार्गावरून फेरफटका मारला आणि खड्डे बुजवले जाणार असे सांगितले. त्यानंतर रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री झाले; पण या दोन्ही मंत्र्यांच्या कालावधीत महामार्गाचे काहीच काम झाले नाही. आता पण पालकमंत्री खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याचे सांगत आहेत. ठेकेदाराला प्रत्येक वर्षी दहा टक्क्याने पैसे दिले जात आहेत. परिणामी येथील जनतेवर ठेकेदार किंवा पालकमंत्री उपकार करत नाहीत. जनतेच्या पैशातील ते पैसे ठेकेदाराला मिळत आहेत. त्या पैशातून सुद्धा ठेकेदार रस्त्यांचे खड्डे चांगल्या पद्धतीने भरत नाहीत ही शोकांतिका आहे. त्या विरोधात सुद्धा हे आंदोलन आहे.’’
श्री. पारकर म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणाची पूर्णतः दुरावस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी या मार्गावर अपघात होत आहेत. गेली अनेक वर्षे अनेक नेते हा महामार्ग पूर्ण होणार अशी आश्वासने देत आहेत. जिल्हावासीय व ठाकरे शिवसेनेच्या वतीने फार मोठे आंदोलन ओसरगांव येथे टोलच्या संदर्भात तत्कालीन श्री. नाईक यांच्या नेतृत्वाखाली केलेले होते. त्यावेळी टोल वसुली सुरुवात करणार होते, अशावेळी जिल्ह्यातील जनता, व्यापारी, शिवसैनिक एकत्र आले त्यामुळे टोल थांबला. आजही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यावर आवाज उठवण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन हुमरमळा येथे घेत आहोत. या आंदोलनात जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.’’

चौकट
पंधरा वर्षातच रस्ता निकृष्ट
श्री. सावंत म्हणाले, ‘‘श्री. गडकरी यांनी या महामार्गाची पायाभरणी केली, त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, शंभर वर्ष या रस्त्याला काहीही होणार नाही. पण, गेल्या पंधरा वर्षातच हा रस्ता अत्यंत निकृष्ट प्रतीचा झालेला आहे. महामार्गावरील खड्ड्यांचा निषेध म्हणून आम्ही १३ ला आंदोलन करत आहोत. पक्षीय राजकारण करून आरो लाईनच्या बाजूला असलेले दुकाने सुद्धा महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून पाडली जात आहेत. त्यामुळे हे आंदोलन त्या अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात सुद्धा आहे. हे आंदोलन जरी ठाकरे शिवसेनेचे असले तरी जिल्ह्यातील व्यापारी, जिल्ह्यातील वाहतूकदार या सर्वांना याचा त्रास होत आहे. या आंदोलनानंतर महामार्ग प्रशासनाला जाग आली नाही तर पुन्हा एकदा गणेशोत्सवानंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India responds strongly to Trump: ट्रम्प यांचे आरोप अन् टॅरिफ वाढवण्याच्या धमकीला आता भारताचंही सडेतोड प्रत्युत्तर, म्हटले...

Video Viral : गुजरातमध्ये हत्तीवर अन्याय! व्हिडीओ व्हायरल; 'महादेवी'प्रमाणे पेटा लक्ष घालणार का?

Local Block: मोठी बातमी! ५ ते ८ ऑगस्टपर्यंत लोकलचा विशेष ब्लॉक, सेवा पूर्णपणे बंद राहणार, जाणून घ्या वेळापत्रक

Truck Accident : गोंडपिपरीत विचित्र अपघात! ट्रॅकने एक किलोमीटर नेले फरफटत; एकाचा मृत्यू, तीन गंभीर

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

SCROLL FOR NEXT