कोकण

विद्यार्थ्यांची कल्पकता; साकारली मराठी सणांची सृष्टी

CD

82508

विद्यार्थ्यांची कल्पकता; साकारली मराठी सणांची सृष्टी

कुडाळमधील ‘श्रावणधारा’; क.म.शि.प्र. इंग्रजी शाळेचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः येथील क.म.शि.प्र. मंडळाची इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेत श्रावणधारेतून विद्यार्थ्यांनी विविध सणांची सृष्टी साकारली. श्रावण महिना निसर्ग, सण, भक्ती आणि संस्कृतीचा संगम मानला जातो. या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये ‘श्रावणधारा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आपले पारंपरिक सण व त्या सणांची माहिती समजावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.
या कार्यक्रमाच्या सजावटीतून श्रावणात पुजल्या जाणाऱ्या सर्व देवतांची चित्रे व मूर्त्या यांचे दर्शन घडविण्यात आले. श्रावणातील शाकाहारी व सात्विक आहार प्रत्यक्षरित्या केळीच्या पानात मांडून दाखविला. या कार्यक्रमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गणेश वंदना या कार्यक्रमाने ‘श्रावणधारा’ कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांनी श्रावण स्वागत गीताद्वारे वातावरण भक्तिमय केले.
श्रावणाचे महत्त्व सांगणारी भाषणे, पावसाळी गोष्ट आणि श्रावणातील विविध सणांची प्रात्यक्षिके व माहिती यांनी प्रेक्षकांना श्रावण महिन्याच्या विविध रंगांचा अनुभव मिळवून दिला. श्रावणातील प्रत्येक सणामागे काहीतरी गोष्ट आहे, हे विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजले. सणांप्रमाणे केलेली वेशभूषा आणि त्या सणांची माहिती विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावीपणे मांडली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी पारंपरिक मंगळागौरचे खेळ, फुगडी, झिम्मा व उखाणे सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रशालेच्या सहायक शिक्षिका दिव्या खानोलकर यांनी सूत्रसंचालन केले. सहायक शिक्षिका नेहा कुडाळकर, मिराली मयेकर, पूजा खानोलकर आदी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ज्यांनी ‘ई-केवायसी’ केली नाही, त्यांना मिळणार एक महिन्याची मुदत?; दुरुस्तीची आज संपणार मुदत, मे महिन्यात मिळणार ३००० रुपये

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

SCROLL FOR NEXT