- rat६p२१.jpg-
२५N८२५५१
साखरपा ः कोंडगावमध्ये विद्युतखांबावर पसरलेल्या वेली तर दुसऱ्या छायाचित्रात झाडाच्या फांद्या विद्युतवाहिनीला स्पर्श करत आहेत.
विद्युतवाहिनींवर झाडाच्या फांद्या
कोंडगावमधील प्रकार; वीजपुरवठा खंडित होण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ६ ः तालुक्यातील कोंडगाव येथील दत्तदर्शन पथ ते भडकंबा रोडवर विद्युतवाहिनीला झाडाच्या फांद्या स्पर्श करत आहेत. तसेच बाजारपेठेतही हाच प्रकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्पार्किंग होऊन वीजपुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. झाडांच्या फाद्यांची वाढ झालेली असून, जंगलभाग वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये हे चित्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. कोंडगाव येथील दत्तदर्शन पथ ते भडकंबा रोडवर आणि बाजारपेठ परिसरात महावितरणच्या वाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होत असल्याने वीजपुरवठा खंडित होतो. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याबाबत ग्रामस्थ रमाकांत पाटेकर यांनी अर्जही दिला होता. त्याची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या परिसरातील काही विद्युतवाहिनी झाडाझुडपांच्या अगदी जवळ आलेल्या आहे. काही ठिकाणी विद्युतखांबावरही वेलींचे साम्राज्य पसरलेले आहे. अनेक ठिकाणी रोड ओंलाडण्याच्या ठिकाणी गार्डिंग केलेले नाही. याकडे महावितरण विभाग डोळेझाक करत आहे. या प्रकारांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
चौकट
तीन जणांनी गमावला जीव
साखरपा जाधववाडी येथे काही दिवसांपूर्वी घराजवळ तुटून पडलेल्या विद्युतवाहिनीने एका महिलेचा जीव घेतला होता. रत्नागिरी तालुक्यातही निवळी येथे दोघांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी संबंधित वायरमनवरही गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.