कोकण

सुव्यवस्थेचा नवा अध्याय; ‘सावंतवाडी’साठी ११ नवी तलाठी कार्यालये

CD

82581

सुव्यवस्थेचा नवा अध्याय; ‘सावंतवाडी’साठी ११ नवी तलाठी कार्यालये

दीपक केसरकरांचा पुढाकार; ३ मंडल अधिकारी इमारतींसाठीही निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः आमदार दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तीन तालुक्यांमध्ये ११ नवीन तलाठी कार्यालये आणि ३ मंडल अधिकारी कार्यालयांच्या इमारती उभारण्यासाठी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या भागातील प्रशासकीय कामकाजाला मोठी चालना मिळणार आहे.
सावंतवाडी तालुक्यासाठी सर्वाधिक ६ तलाठी कार्यालये मंजूर झाली आहेत. ती माडखोल, दाणोली, सावंतवाडी शहर, इन्सुली, आरोंदा आणि तळवडे येथे उभारली जाणार आहेत. याशिवाय सावंतवाडी शहरासाठी एक मंडळ अधिकारी कार्यालय देखील मंजूर झाले आहे. दोडामार्ग तालुक्यात तळकट येथे एक तलाठी आणि एक मंडळ अधिकारी कार्यालय मंजूर झाले आहे. याव्यतिरिक्त झोळंबे, पिकुळे आणि सासोली येथेही नवीन तलाठी कार्यालयांच्या इमारती उभारल्या जाणार आहेत. वेंगुर्ले तालुक्यात आडेली आणि वेतोरे येथे तलाठी कार्यालयांच्या इमारतींना मंजुरी मिळाली आहे. वेतोरे येथे मंडळ अधिकारी कार्यालय देखील स्थापन होणार आहे.
-------
अडचणींमुळे इतर ठिकाणी मंजुरी रखडली
दरम्यान, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यात काही ठिकाणी ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नसल्याने कार्यालये उभारण्यात अडचणी येत आहेत. दोडामार्ग तालुक्यात साटेली भेडशी येथे तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालय तसेच वेंगुर्ले तालुक्यात म्हापण येथे मंडल अधिकारी कार्यालय जागा नसल्यामुळे मंजूर होऊ शकलेले नाही. तसेच, वजराट येथील तलाठी कार्यालयाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

RR vs DC Live: फुलटॉसवर यशस्वी गेला अन् भन्नाट यॉर्करने वैभव सूर्यवंशीचा त्रिफळा उडवला; Kyle Jamieson चे सेलिब्रेशन पाहा Video

SCROLL FOR NEXT