Mitchell Starc and Kyle Jamieson celebrate crucial early wickets
ESAKAL
Rajasthan Royals vs Delhi Capitals Marathi Update: इंडियन प्रीमिअर लीग २०६ च्या पर्वाची आश्वासक सुरुवात करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची गाडी नंतर घसरली. त्यामुळे ते गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर घसरले आहेत आणि ८ सामन्यांत त्यांनी फक्त ३ विजय मिळवले आहेत. आता त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे. पण, त्यांच्यासमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. RR चा संघ ९ सामन्यांत ६ विजय मिळवून १२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पण, आजचा सामना एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे.