कोकण

‘शक्तीपिठ’बाबत आमदारांकडून ‘भुलथापा’ ः डॉ. जयेंद्र परुळेकर

CD

‘शक्तीपिठ’बाबत आमदारांकडून
‘भुलथापा’ ः डॉ. जयेंद्र परुळेकर

सावंतवाडी, ता. १२ ः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या ‘शक्तीपीठ महामार्गा’बाबत विद्यमान आमदार जनतेची दिशाभूल करत असून ते जनतेला पुन्हा ‘गाजर’ दाखवत आहेत, असा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला. शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलून तो आंबोलीवरून मळगाव किंवा झिरो पॉईंट, तिथून तिलारी आणि पुढे रेडी जेटीपर्यंत नेण्याची विनंती सरकारकडे केल्याचे ते सांगत आहेत. मात्र, या केवळ ‘भुलथापा’ असून जनतेचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास राहिला नाही, असेही परुळेकर त्यांनी म्हटले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून परुळेकर यांनी सरकारवर टीका करताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या सरकारच्या कार्यकाळात राज्यातील कंत्राटदारांचे ९० हजार कोटी आणि जिल्ह्यातील कंत्राटदारांचे ५०० कोटी रुपये थकीत आहेत, त्यामुळे कंत्राटदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, त्याच राज्यात ८६ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग कोणाला हवा आहे? असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे. नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग असताना विदर्भ आणि कोकणाला जोडणारा आणखी एक महामार्ग काढण्याचा हा प्रयत्न कोणाचा आहे? हा रस्ता जनतेच्या किंवा पर्यटनासाठी आहे की सत्ताधारी नेत्यांचे ‘उखळ पांढरे’ करण्यासाठी? सहा महामार्ग एकाच तालुक्यातून गेल्याने, सर्व जनतेला येथून दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा घाट घातला जात आहे का, असा संतप्त प्रश्‍न परुळेकरांनी उपस्थित केला आहे. परुळेकर यांनी आमदारांवर जनतेच्या खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. सततचा खंडित होणारा वीजपुरवठा, युवा वर्गात वाढती ड्रग्जची व्यसनाधीनता, आरोग्य व्यवस्थेचे ‘तीन तेरा’ आणि परप्रांतीय हडप करत असलेल्या जमिनी यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे आमदारांचे लक्ष नसल्याचे परुळेकरांनी म्हटले आहे.
---------------
सावंतवाडीतून जाणार सहा महामार्ग
भविष्यात सावंतवाडी हा राज्यातील एकमेव असा तालुका असेल, जिथून तब्बल सहा महामार्ग जातील, अशी उपरोधिक टिप्पणीही परुळेकर यांनी केली आहे. यात मुंबई-गोवा महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, प्रस्तावित सागरी महामार्ग, संकेश्वर-बांदा महामार्ग, पनवेल-बांदा आणि सह्याद्री महामार्गाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : मुख्यमंत्री मद्यप्राशन करून विधानसभेत पोहोचले? अकाली दलने शेअर केला व्हिडीओ, डोपिंग टेस्टची मागणी...

Thane: ठाण्यात पहिल्यांदाच डबल डेकर बस धावणार, कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार?

Crime: जमिनीच्या वादातून तरुणाला संपवलं; नंतर मृतदेहाची जंगलात विल्हेवाट, ठाण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला अटक, १२ वर्षांनी गूढ उलगडलं

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी...४३ अंशांच्या तडाख्यानंतर जिल्हावासीयांना सुखद दिलासा!

Anewadi Toll Traffic Jam : पुणे-बंगळुरू हायवेवर 5 किमीच्या रांगा! आनेवाडी टोलवर मुंबई–पुण्यातील चाकरमानी अडकले; सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर प्रचंड गर्दी

SCROLL FOR NEXT