कोकण

तुतारी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकातील तांत्रिक त्रुटीं दूर करा

CD

‘तुतारी’च्या वेळापत्रकातील त्रुटी दूर करा
कोकण रेल्वे प्रवासी समिती ः चाकरमान्यांना नाहक त्रास
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसला दररोज प्रवाशांची प्रचंड गर्दी असते; मात्र वेळापत्रकातील तांत्रिक त्रुटींमुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या गाडीच्या वेळापत्रकातील दीर्घ थांबे कमी करावेत, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली आहे.
मंगळवारी (ता. ५) रात्री १२.०७ वाजता दादर रेल्वेस्थानकातून निघालेली तुतारी एक्स्प्रेस दुपारी १२.५९ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचली. ही गाडी केवळ ९ मिनिटे उशिरा धावत असल्याचे दाखवण्यात आले असले तरीही प्रत्यक्ष प्रवासात वेळेचे नियोजन अत्यंत अकार्यक्षम होते. तुतारी एक्स्प्रेस खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड आदी स्थानकांवर १० ते २० मिनिटे वेळेआधी पोहोचते. विशेष म्हणजे रत्नागिरी येथे ही गाडी नियोजित वेळेच्या तब्बल ६३ मिनिटे आधी सकाळी ७.५७ वाजता पोहोचते आणि त्यानंतर तब्बल ६८ मिनिटे तिथे थांबते. तुतारी एक्स्प्रेस ही कोकण रेल्वेमार्गावरील मुंबईशी जोडणारी नियमित गाडी आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या सोयीसाठी वेळापत्रकात योग्य त्या सुधारणा कराव्यात, अशी भूमिका प्रवासी संघटनांनी घेतली आहे. या गाडीचे वेळापत्रक तयार करताना एखाद्या स्थानकात अधिक वेळ थांबा दिल्याने प्रवाशांचा वेळ वाया जातो. रत्नागिरीसारख्या प्रमुख स्थानकावर ही गाडी तासभर थांबवण्याची गरज नाही, असे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी सांगितले.


प्रमुख मागण्या
* थांब्यासाठी जो वेळ दिला जातो तो कमी करून अंतिम टप्प्यावर वळवावा
* रत्नागिरीसह इतर स्थानकांवरील अनावश्यक थांबे कमी करावेत.
* संपूर्ण वेळापत्रक वस्तूनिष्ठपणे पुन्हा तयार करावे.
.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : 'तू हफ्ता कसा देत नाही बघतो' म्हणत पोलिसांनी विक्रेत्याला केली बेदम मारहाण; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही पाहा

Khokya Bhosale : खोक्या भोसलेला जामीन मंजूर, तीनपैकी एका गुन्ह्यात दिलासा

Gulf Of Mexico: गल्फ ऑफ मेक्सिकोचे ‘गल्फ ऑफ अमेरिका’ नामांतर; डेस्टीनच्या किनाऱ्यावर ट्रम्प थीम वस्तूंची विक्री जोमात

Thackeray Group Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गट शून्य झाला तरी अंतर्गत वाद मिटण्याचे नाव नाही, उद्धव ठाकरे आव्हान पेलणार का?

खुशखबर! Samsung Galaxy S24 Ultra स्मार्टफोनवर चक्क 50 हजारचा डिस्काउंट, ऑफर पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT