कोकण

-नवोदयमध्ये आयपीएस, आयएएस अधिकारी घडवा

CD

rat११p१७.jpg -
२५N८३६५५
राजापूर ः पडवे येथील नवोदय विद्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना आमदार किरण सामंत.

नवोदयमध्ये आयपीएस, आयएएस घडवा
आमदार किरण सामंत ः प्रलंबित समस्या मार्गी लावणार, पंखे, गिझर सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः तालुक्यातील पडवे येथील नवोदय विद्यालयातून आयपीएस, आयएएस अधिकारी घडावेत आणि त्यांनी लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघासह रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावं, असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले. या वेळी विद्यालयातील प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लावण्याचेही आश्‍वासन त्यांनी दिले.
पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्यासह प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या पाठपुराव्यातून जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून उपलब्ध झालेल्या साहित्याच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. नवोदय विद्यालयात गरम पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार सामंत यांनी विद्यालयाला जेएसडब्ल्यू कंपनीतर्फे फॅन आणि गिझर देऊ, असा शब्द दिला होता. कंपनीने ३०० फॅन आणि १० गिझर विद्यालयाकडे सुपूर्द केले. त्यामुळे नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांची समस्या दूर होणार आहे.
विद्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी आमदार सामंत यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती विलास चाळके, नियोजन समिती सदस्य दीपक नागले, रवींद्र नागरेकर, आरडीसी बँकेचे संचालक मुन्ना खामकर, जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या संपदा धोपटकर, प्राचार्य एम. बसवराज, नायब तहसीलदार सरफरे, पडवेचे उपसरपंच संतोष तांबे, नंदू मिरगुले, राजन कोंडेकर यांच्यासह पालक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. या प्रसंगी आमदार सामंत यांनी नवोदय विद्यालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार! कधी अन् कुठे, IMDने तारीखच सांगितली

Zomato delivery boy accident: झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात पडला उघड्या गटारात अन् मग...

मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेचे काम अंतिम टप्प्यात, प्रवासात पाच तासांची बचत; कधीपासून होणार वाहतूक सुरु?

Mhada House: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाचे घर होणार आणखी स्वस्त, किती टक्क्यांनी घटणार; वाचा अहवाल

PM Modi and Zelenskyy : मोठी बातमी! आता मोदी अन् झेलेन्स्कींचीही झाली चर्चा; जाणून घ्या, कोण काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT