
मुंबई : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने राज्यभरात पुन्हा हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत असून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशातच आता पुढील आठवडाभर राज्यातील काही भागात मुसळधार सरी कोसळणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.