कोकण

-ब्रिज स्पर्धेत मुळे-सोहोनी जोडी विजयी

CD

-rat११p९.jpg-
P२५N८३६४५
रत्नागिरी : टिळक आळी शताब्दी गणेशोत्सवानिमित्त आयोजित ब्रिज स्पर्धेतील विजेते सचिन मुळे आणि रामचंद्र सोहनी यांना बक्षीस देताना मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे.
---
ब्रिज स्पर्धेत मुळे-सोहोनी जोडी विजयी
शताब्दी गणेशोत्सव ; पटवर्धन-आगाशे द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : शहरातील टिळक आळी येथील श्री मारुती- गणपती पिंपळपार देवस्थान यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ब्रिज स्पर्धेत सचिन मुळे आणि रामचंद्र सोहनी जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अभय पटवर्धन-माधव आगाशे आणि तृतीय क्रमांक मोहन दामले-विनायक मुळ्ये जोडीने पटकावला.
ही स्पर्धा मंगल कार्यालयात रविवारी झाली. देवगडच्या खेळाडूंसाठी ठेवलेले उत्तेजनार्थ पारितोषिक दिनकर गोगटे-श्रीकांत बर्वे जोडीने पटकावले. त्याचप्रमाणे असोसिएशनतर्फे श्रीकांत जोशी-मिलिंद करमरकर या जोडीचा नवीन होतकरू खेळाडू म्हणून सत्कार करण्यात आला. या स्पर्धेचे संयोजन रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनतर्फे करण्यात आले. स्पर्धा रत्नागिरी, राजापूर आणि देवगड तालुक्यातील ब्रिज खेळाडूंसाठी ठेवण्यात आली होती. एकूण २४ खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्‍घाटन टिळक आळी मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे यांच्या हस्ते नामांकित ब्रिज खेळाडू व मंगल कार्यालयाचे मालक (कै.) अप्पा वैद्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. एकूण ४४ बोर्ड खेळण्यात आले. शेवटी टिळक आळी मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे, सदस्य करमरकर आणि रत्नागिरी ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले व सचिव सचिन जोशी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे स्कोअरर म्हणून चिंतामणी दामले व विनायक मुळ्ये यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार! कधी अन् कुठे, IMDने तारीखच सांगितली

Zomato delivery boy accident: झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात पडला उघड्या गटारात अन् मग...

मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेचे काम अंतिम टप्प्यात, प्रवासात पाच तासांची बचत; कधीपासून होणार वाहतूक सुरु?

Mhada House: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाचे घर होणार आणखी स्वस्त, किती टक्क्यांनी घटणार; वाचा अहवाल

PM Modi and Zelenskyy : मोठी बातमी! आता मोदी अन् झेलेन्स्कींचीही झाली चर्चा; जाणून घ्या, कोण काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT