कोकण

-बंदी मोडून पर्ससीन जाळ्यांच्या नौका समुद्रात

CD

-rat१२p३०.jpg-
२५N८३९६६
दापोलीः अवैध मासेमारीविरोधात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना मच्छीमार नेते पी. एन. चोगले.
----
बंदी आदेश मोडून पर्ससीन नौका समुद्रात
पारंपरिक मच्छीमार आक्रमक ; कायदा कागदावरच
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १२ : बंदी असूनही एलईडी नौका आणि १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंतच परवानगी असलेल्या पर्ससीन जाळ्यांच्या नौकांनी थेट समुद्रात उतरण्यास सुरुवात केली आहे. या एलईडी व पर्ससीन मासेमारी नौकांच्या अवैध मासेमारीविरोधात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतीच दापोली तालुक्यातील उटंबर येथील राधाकृष्ण मंदिरात या विषयावर बैठक झाली.
१ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच मासळीची आवक अत्यल्प आहे. त्यात बंदी असूनही एलईडी नौका आणि १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंतच परवानगी असलेल्या पर्ससीन जाळ्यांच्या नौकांनी थेट समुद्रात उतरण्यास सुरुवात केली आहे. रायगडातील श्रीवर्धनसह काही बंदरांवर सरकारी अधिकाऱ्यांसमोरच या नौकांची तयारी सुरू असून, विरोधाचा अभाव असल्याचे पारंपरिक मच्छीमारांचे म्हणणे आहे.
मच्छीमार संघटनांनी मागील काही वर्षांत आंदोलने, निवेदने व पाठपुरावा करूनही शासनाकडून ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला. शासनाने डोळेझाक केल्याने या बेकायदेशीर पद्धतींना अभय मिळाल्याचा आरोपही करण्यात आला तसेच या मासेमारीविरोधात कायदा पारीत करण्यात आला आहे. त्याची देखील व्यवस्थित अंमलबजावणी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मासेमारी तत्काळ थांबवावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी रायगड व रत्नागिरीतील पारंपरिक मच्छीमार एकत्र आले असून, लवकरच उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

चौकट
कोकण किनारपट्टीवर मत्स्यदुष्काळ
या बेकायदेशीर मासेमारीमुळे गेल्या ५-६ वर्षांपासून कोकण किनारपट्टीवर मत्स्यदुष्काळ निर्माण झाला आहे. परिणामी, सध्या सुमारे ८० टक्के पारंपरिक नौका बंदरात व खाड्यांमध्ये नांगरून ठेवलेल्या आहेत. उदरनिर्वाहावर गदा येऊन तरुणपिढीत या व्यवसायाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Life Threat: ‘’माझ्या जीवाला धोका…’’ ; राहुल गांधींकडून पुणे कोर्टात अर्ज अन् महात्मा गांधींच्या हत्येचाही उल्लेख!

स्वातंत्र्यदिनी केडीएमसी हद्दीत चिकन-मटण पार्टी रंगणार, जितेंद्र आव्हाड पार्टीचे नेतृत्व करणार; नवा वाद पेटणार?

Bank Charges: खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! १५ ऑगस्टपासून व्यवहारांवर शुल्क आकारणार, IMPS शुल्कात मोठा बदल

Dharashiv Crime : धाराशिव हादरले! भरदिवसा रक्तरंजित सूड; पती-पत्नीचा कोयत्याने निघृण खून

पैशासाठी IPL विजेत्या KKR ची साथ सोडायला निघालेला भारतीय खेळाडू! धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT