कोकण

आंबोलीच्या गोविंद गावडेची ''आशिया पॅसिफिक''मध्ये नोंद

CD

84451

आंबोलीच्या गोविंद गावडेची
‘आशिया पॅसिफिक’मध्ये नोंद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ः तालुक्यातील आंबोली येथील रहिवासी तबला वादक गोविंद गावडे या तरुणाने आशिया पॅसिफिक ग्लोबल रेकॉर्डमध्ये (२२७ देशांचा समावेश) सलग आठ तास पंचवीस मिनिटे शिव-तांडव स्तोत्रावर तबला वादन करून एक नवा विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला. कोल्हापूर येथील श्रावणी सोमवारी शिक्षण महर्षी डॉ. साळुंखे सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम पार पडला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने केवळ आंबोलीच नाही, तर संपूर्ण सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे.
गोविंद हा सध्या कोल्हापूर येथे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. त्याला डॉ. कदम यांचे मार्गदर्शन, श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांची संपूर्ण टीम आणि विशेषतः सेक्रेटरी शुभांगी गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. या विक्रमामागे त्याची मेहनत तसेच त्याचे आई-वडील आणि कुटुंबीयांनी परिश्रम घेतले. गोविंदने सकाळी ठीक आठ वाजता तबला वादनाला सुरुवात केली. सलग आठ तास पंचवीस मिनिटे त्याने वादन केले. परंतु, आशिया पॅसिफिक ग्लोबल रेकॉर्डच्या नियमांनुसार पूर्व परवानगी घेऊन वेळेची मर्यादा निश्चित केली असल्याने निर्धारित वेळेतच त्याला थांबवावे लागले. गोविंदच्या या कामगिरीमुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या प्रसंगी बाबुराव गावडे यांचे कुटुंबीय, गेळे गावचे माजी सरपंच प्रकाश गवस, प्रकाश गावडे, चंद्रकांत गावडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT