- rat१४p३३.jpg-
P२५N८४५४५
पायल पवार
- rat१४p३४.jpg-
P२५N८४५४६
महेश मिल्के
- rat१४p३५.jpg-
P२५N८४५४७
आकांक्षा कदम
- rat१४p३६.jpg-
२५N८४५४८
प्राप्ती किनरे
- rat१४p३७.jpg-
P२५N८४५४९
मार्तंड झोरे
- rat१४p३८.jpg-
२५N८४५५०
इशा पवार
- rat१४p३९.jpg-
२५N८४५५१
रणवीर सावंत
- rat१४p४०.jpg-
२५N८४५५२
श्रेया सनगरे
---
उत्कृष्ट खेळाडू, मार्गदर्शक पुरस्कार जाहीर
जिल्हा क्रीडा कार्यालय; कॅरमपटू आकांक्षा कदमला थेट पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे दिले जाणारे जिल्हा क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. त्यात उत्कृष्ट खेळाडू एक महिला, पुरुष, दिव्यांग खेळाडू आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिला थेट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील २०२१-२२, २०२३-२४, २०२४-२५ या कालावधीतील उत्कृष्ट खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांचा उद्या (ता. १५) मुख्य शासकीय कार्यक्रमामध्ये पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शकासाठी मान्यताप्राप्त क्रीडाप्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले खेळाडू तसेच राज्य व जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळवणारे खेळाडू घडवणारा मार्गदर्शक यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. गुणवंत खेळाडू (महिला, पुरुष, दिव्यांग) यासाठी मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य व राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ-कनिष्ठ शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धांमधील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गुणवंत खेळाडू पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे तसेच अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूला जिल्हा क्रीडा पुरस्कार थेट देण्यात येतो. या पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रुपये १० हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
चौकट
यांना मिळाले पुरस्कार
जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थीं पुढीलप्रमाणे ः धनुर्विद्या क्रीडाप्रकारासाठी मार्तंड संजय झोरे, ईशा केतन पवार व खो-खो खेळासाठी श्रेया राकेश सनगरे, पायल सुधीर पवार; कॅरम खेळासाठी आकांक्षा उदय कदम, योगासनासाठी प्राप्ती शिवराम किनरे यांना गुणवंत खेळाडू पुरस्कार देण्यात येणार आहे. मल्लखांब क्रीडाप्रकारासाठी रणवीर अशोक सावंत, जलतरणासाठी महेश शंकर मिल्के यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.