- rat१४p२४.jpg-
P२५N८४४९६
लोटे एमआयडीसी.
लोटेतील कंपन्या अमेरिकेला शोधणार पर्याय
अवलंबित्व कमी करणार; भविष्यातील परिणामांचा अभ्यास
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः अमेरिकेच्या करवाढीच्या परिणामातून भविष्यात लोटेतील उद्योजकही सुटणार नाहीत. जगातील इतर बाजारपेठांचा शोध घेऊन अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्याय शोधले जात आहेत, अशी माहिती लोटे एमआयडीसीतील विविध कारखानदारांच्या व्यवस्थापकांनी दिली. राष्ट्रीय स्तरावरील उद्योजक संघटनाही यासाठी अभ्यास करत आहेत.
भविष्यात भारताने नवीन करार केल्यास देशभरातील उद्योजकांना फटका बसू शकतो. त्यात लोटेतील उद्योजकांचीही अडचण होणार आहे. लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्र सुमारे २ हजार ७३८ एकरमध्ये पसरलेले असून, त्यात सुमारे ४५७ हून अधिक औद्योगिक भूखंड आहेत. या उद्योगांमधून सुमारे १५ हजार कोटींची उलाढाल होते. त्यात युएसव्ही, कान्साई नेरोलॅक पेंट्स, घरडा केमिकल्स, डाऊ केमिकल, पेंटोकी ऑर्गेनी (इंडिया), भावना पेट्रोकेम, पार्को फार्मास्युटिकल अँड केमिकल्स, इंडियन ऑक्सलेट, एल्टेक फाइन केम, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, पुष्कर केमिकल, लक्ष्मी ऑर्गानिक, एक्सेल, कृष्णा अँटिऑक्साइड या कंपन्यांचे मोठे योगदान आहे. त्यातील बहुतांशी कारखानदारांचे उत्पादन अमेरिकेत निर्यात होते. अमेरिकेने निर्यात कर वाढवले तर उद्योजकांना त्यांच्या वस्तूंचे दरही वाढवावे लागतील किंवा जगातील इतर बाजारपेठेत वस्तू पाठवाव्या लागतील. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर प्रयत्न सुरू आहेत, असे उद्योजकांनी सांगितले.
कोट १
अमेरिकेने भारतावर भरमसाठ आयात कर वाढवला तर काय होऊ शकते? याचा आतापर्यंत विचार भारताने केला नव्हता; मात्र उशिरा का होईना भारत सरकारने पर्यायी मार्गांचा विचार सुरू केला आहे. यातून जे घडेल ते भारताच्या आणि येथील उद्योजकांच्या हिताचे असेल.
- सुयोग चव्हाण, व्यवस्थापक कृष्णा अँटिऑक्साइड खडपोली
...........
कोट २
इंडियन केमिकल कौन्सिल आणि बॉम्बे चेम्बर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून जगातील इतर बाजारपेठांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. चायना कमी दरात त्याचे उत्पादन जगात विकत असताना भारतासमोर मोठे संकट आहे; पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर भारताला स्वावलंब होण्यासाठी ही एक संधी आहे.
- आनंदा पाटणकर, व्यवस्थापक एक्सेल इंडिया लोटे
............
कोट ३
अमेरिकेने लागू केलेल्या निर्यात करवाढीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्ग काढतील. अमेरिकेत वस्तू निर्यात करायची नाही, म्हटले तर मोठी बाजारपेठ हातातून जाईल. नवीन बाजारपेठ मिळेपर्यंत जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडणार आहेत. त्या सर्वांनाच तोंड द्यावे लागेल. आम्ही सर्व प्रकारच्या पर्यायांवर विचार करत आहोत.
- महादेव महिमान, व्यवस्थापक विनती ऑरगॅनिक, लोटे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.