-rat१६p४१.jpg-
२५N८४८१४
राजापूर ः न्यू हनुमान दिवटेवाडीच्या पथकानेही जवाहर चौकात सात थर लावले.
-----
पाच पथकांची सात थरांची सलामी
राजापुरात दहीहंडीचा उत्साह; नागरिकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः शहर आणि तालुका परिसरात शनिवारी (ता. १६) पारंपरिक पद्धतीने दहीकाला उत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी जवाहरचौक येथे आयोजित दहीहंडी उत्सवात शहर आणि तालुक्यातील विविध गोविंदा पथकांनी भाग घेत उत्सवाची रंगत वाढवली. उत्सवात सहभागी पाच पथकांनी सात थराची सलामी दिली.
दहीहंडी पाहण्यासाठी शहर आणि तालुका परिसरातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यातील सहभागी पाच गोविंदा पथकांनी सात मानवी मनोरे रचत दहीहंडीला सलामी दिली. या सर्व पथकांना रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात आले.
शहरात विविध ठिकाणी दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. त्या शहरातील रूमडेवाडी, चव्हाणवाडी, दिवटेवाडी तसेच गुरववाडी, ओगलेवाडी, आंबेवाडी, वरचीपेठ, खडपेवाडी, कोंढेतड धोपटेवाडी येथील गोविंदा पथकांनी फोडत उत्सवाचा आनंद साजरा केला.
सायंकाळी जवाहरचौक येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात जुगादेवी गोविंदा पथक तेरवण थोरलीवाडी, हनुमान प्रसन्न खडपेवाडी, निनादेवी गोविंदा पथक कणेरी, धुतपापेश्वर युवक मंडळ राजापूर, शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर, श्री महाकाली गोविंदा पथक आडिवरे, श्री कालिकादेवी गोविंदा पथक भू, वायूपुत्र गोविंदा पथक आंबेवाडी, न्यु हनुमान गोविंदा पथक दिवटेवाडी, बालगोपाळ मित्रमंडळ राजापूर, वरचीपेठ गोविंदा पथक राजापूर आदी गोविंदा पथकांनी उत्सवात सहभागी होत उत्सवाचा आनंद लुटला. हनुमान प्रसन्न खडपेवाडी, महाकाली आडिवरे, कालिकादेवी भू, न्यु हनुमान दिवटेवाडी, वरचीपेठ गोविंदा पथकांनी सात थरांचे मनोरे रचून सलामी दिली. दहीहंडी उत्सवाला पालकमंत्री उदय सामंत, बापू म्हाप, अपूर्वा सामंत यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते दहीहंडी स्पर्धेतील सहभागी पथकांना रोख पारितोषिक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.