
भारताचे दुसरे अंतराळवीर शुभांशू शुक्ला ISS मोहिमेनंतर मायदेशी परतले आणि दिल्लीत भव्य स्वागत झाले.
त्यांनी अॅक्सिओम-४ मोहिमेत पायलट म्हणून काम केले, जे भारताच्या गगनयान व भविष्यातील अंतराळ योजनांसाठी महत्त्वाचे ठरेल.
शुक्ला २३ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींना भेटणार असून त्यांच्या अनुभवाचे दस्तऐवजीकरण राष्ट्रीय अंतराळ कार्यक्रमासाठी उपयोगी ठरेल.
Shubhanshu Shukla Axiom-4 Mission : भारताचे दुसरे अंतराळवीर आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय असलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आपल्या मायदेशी परतले आहेत. ते रविवारी पहाटे दिल्लीत पोहोचले. विमानतळावर त्यांचे कुटुंबीय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि अन्य लोकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि 'भारत माता की जय'च्या घोषणांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी तिरंगाही फडकवण्यात आला.