कोकण

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान प्रेरणादायी

CD

85221

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान प्रेरणादायी
पी. के. चौकेकर ः चौकेत ‘अहिल्यादेवी होळकर’ पुरस्काराचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : ग्रामीण भागांतील महिला सामाजिक जाणिवेतून पुढे येत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. स्वातंत्र्यदिनी अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणे आनंददायी आहे. यातून इतरांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन चौके सरपंच पी. के. चौकेकर यांनी केले.
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वेदवती गावडे आणि हर्षदा गावडे यांना स्वातंत्र्यदिनी चौके ग्रामपंचायतीच्या वतीने ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार'' प्रदान करण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात चौके मांडखोलवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य वेदवती गावडे यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल तर चौके वावळ्याचे भरड येथील बचतगटाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या हर्षदा गावडे यांना सन्मानित करण्यात आले. सरपंच चौकेकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी श्री. शिंगरे, महसूल अधिकारी श्री. गुरव, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सरमळकर, सामाजिक कार्यकर्ते बिजेंद्र गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे, संतोष गावडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरमळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करत पुरस्कारामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी चौके पोलिसपाटील रोहन चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, विशाखा चौकेकर, जयश्री कदम, अक्षता गायकवाड, सेवानिवृत्त शिक्षक विजय चौकेकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुनुरे, आरोग्य केंद्राच्या डॉ. चैताली ढोले, महा ई-सेवा केंद्राचे श्री. भगत, विनायक गावडे, मयूर गावडे, महेश सावंत, मोहन गावडे, अंगणवाडी सेविका भारती सुकाळी, सुवासिनी परब, आशा स्वयंसेविका सिद्धाली गावडे, अनिता चौकेकर, नीरा सावंत, स्वप्नील चौकेकर यांच्यासह विविध बचतगटांचे प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुविधा गावडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT