कोकण

भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर

CD

85327

भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर

२०० जणांचा समावेश; जुन्या पदाधिकाऱ्यांसह नव्यांना संधी

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १८ ः जिल्हा भाजपची २०२५ ते २०२८ या तीन वर्षासाठी २५ प्रमुख पदधिकाऱ्यांसह तब्बल २०० जणांचा समावेश असलेली जम्बो जिल्हा कार्यकारिणी आज जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेने तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनानुसार आज श्री. सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जिल्हा भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, महेश सारंग, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोळगावकर, संदीप मेंस्त्री, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते.
श्री. सावंत म्हणाले, ‘‘२०२५ ते २०१८ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी जाहीर केलेल्या कार्यकारणीमध्ये जुन्या पदाधिकाऱ्यांसह काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या नवीन कार्यकारणीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून कायम असून उपाध्यक्षपदी प्रमोद रावराणे, अशोक सावंत, प्रसन्ना देसाई, अनिल सावंत, संदीप गावडे, संजना सावंत, संध्या तेरसे, सुषमा खानोलकर, प्रमोद कामत, संदीप परब यांची तर सरचिटणीसपदी महेश सारंग, रणजित देसाई, संदीप साटम, शारदा कांबळे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त जिल्हा चिटणीसपदी आठ जणांची आणि कोषाध्यक्ष व कार्यालय मंत्री असे प्रत्येकी एक अशा एकूण २५ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून ९२ जणांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विशेष निमंत्रित सदस्य व निमंत्रित सदस्य अशी तब्बल २०० जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर केली आहे.’’
----
जिल्ह्यात एकमेव भाजप ‘बलवान’
श्री सावंत म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारणी, १४ मंडल अध्यक्ष, ९२३ शक्ती केंद्रप्रमुख व ९२१ बूथ प्रमुख यांची यापूर्वी निवड केली आहे. आज जिल्हा कार्यकारणी जाहीर केली असून लवकरच महिला मोर्चा, किसान मोर्चा, युवा मोर्चा, अनुसूचित जाती-जमाती मोर्चा तसेच विविध ३० आघाड्यांची जिल्हा रचना जाहीर करणार आहे. जिल्ह्यात सुमारे २००० हून अधिक कार्यकर्ते भाजपच्या विविध कार्यकारणीमध्ये सहभागी असून एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फौज असलेला भाजप जिल्ह्यात एकमेव पक्ष आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT