कोकण

देवरूख ः महाविद्यालयामुळे परिसराचा कायापालट

CD

rat20p7.jpg -
85738
देवरूख ः संस्थापक रवींद्र माने यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ. महेश भागवत.

महाविद्यालयामुळे परिसराचा कायापालट
रवींद्र माने यांचा गौरवोद्गार; अभियांत्रिकी महाविद्यालयाचा वर्धापनदिन
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २० ः महाविद्यालयामुळे भोवतालची परिस्थिती बदलली असून, इथला विद्यार्थी इंजिनिअर बनून समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावत आहे याचा विशेष आनंद आहे, असे कौतुकोद्गार राजेंद्र माने महाविद्यालयाचे संस्थापक रवींद्र माने यांनी काढले.
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा २७वा वर्धापनदिन तसेच संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या कामगिरीचा आढावा सादर केला. त्यांनी मागील २७ वर्षातील यशस्वी वाटचालीची उपस्थितांना माहिती दिली. महाविद्यालयाने आज एनबीए व नॅकसारखी सर्वोच्च दर्जाची मानांकने व काही महत्वाचे पुरस्कार मिळवल्याचेही भागवत यांनी सांगितले. या प्रसंगी रवींद्र माने यांचे मंत्रोच्चाराच्या गजरात औक्षण करण्यात आले. प्राचार्य डॉ. भागवत व सर्व विभागप्रमुखांनी माने यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला कार्यकारी अध्यक्षा नेहा माने, सहसचिव दिलीप जाधव, विश्वस्त जान्हवी माने, सीईओ प्रद्युम्न माने, ईशानी माने, कार्तिकेयन, उपप्राचार्य डॉ. अनिरूद्ध जोशी, प्राचार्य प्रा. नितीन भोपळे उपस्थित होते. या वेळी माने यांनी महाविद्यालयाच्या उभारणीपासून मागील सत्तावीस वर्षातील आपले अनुभव कथन केले. आपले संस्कार व पिंड हा समाजकारणाचा असल्याने त्याच उद्देशाने आपण १९९८ ला हे महाविद्यालय उभे केले, असे माने यांनी सांगितले. या कार्यक्रमानंतर महाविद्यालयात एनएसएस विभागाच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला तसेच डेरवण येथील वालावलकर रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात बहुसंख्य विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्त संक्रमण अधिकारी डॉ. गुरूदेव स्वामी, टेक्निकल सुपरवायझर रवी कुमार यांचे यासाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमादरम्यान मेकॅनिकल विभागातील प्राध्यापक डॉ. अच्युत राऊत यांना व्हायब्रेशन इंजिनिअरिंग या पुस्तकातील त्यांचा संशोधन पेपर प्रकाशित झाल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Doctor Case: 'आरोपींवर कुठलीही दया दाखवली जाणार नाही', Rupali Chakankar संतापल्या | Sakal News

Satara : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलं

Latest Marathi News Live Update : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे वक्तव्य — “आमचे मार्गदर्शक भुजबळसाहेब” म्हणत गोंधळ

Ishwarpura News : बाळासाहेब ठाकरेंची अखेर इच्छा पूर्ण, इस्लामपूरचे झाले ‘ईश्वरपूर’; सर्व दस्ताऐवजांमध्ये होणार बदल

AUS vs IND 3rd ODI: भारताचे गोलंदाज चमकले, ऑस्ट्रेलियाला अडीचशेच्या आत रोखले; आता व्हाईटवॉश टाळण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT